SWARA BHASKAR 
मनोरंजन

सुशांतच्या मृत्युसाठी करण आणि आलियाला दोषी ठरवणा-यांवर भडकली स्वरा भास्कर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे त्याचं कुटुंब धक्क्यातून अजुन सावरत नाहीये. बॉलीवूड कलाकारांपासून ते चाहत्यांपर्यंत सगळ्यांनाच त्याच्या आत्महत्येमुळे धक्का बसला आहे. मात्र त्याची ही आत्महत्या अनेक प्रश्न निर्माण करत आहेत. त्यातंच बॉलीवूडमध्येही पुन्हा एकदा घराणेशाहीचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. यात अनेकांवर आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. याच दरम्यान कॉफी विथ करणचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहून सुशांतच्या चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे.

बॉलीवूडमध्ये घराणेशाहीचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. त्यातंच करणचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असल्याने करण जोहर आणि आलिया भट्ट यांना सोशल मिडियावर चांगलंच ट्रोल केलं जात आहे. या सगळ्या प्रकरणावर अभिनेत्री स्वरा भास्करने ट्वीट करत तिचा संताप व्यक्त केला आहे.

स्वराने लिहिलंय, 'सुशांतच्या मृत्युसाठी करण जोहर आणि आलिया भट्ट यांना दोष देणं हा केवळ मुर्खपणाच नाही तर कपटीपणा आहे.'सुशांतच्या आत्महत्येमुळे बॉलीवूडमधील घराणेशाहीवर पुन्हा एकदा प्रश्न केला जातोय. ज्यावर कंगना रनौतपासून ते प्रकाश राज पर्यंत अनेकांनी असा दावा केला आहे की सुशांतचं बॉलीवूडमध्ये फिल्मी कनेक्शन नसल्याने त्याला संधी दिल्या गेल्या नाहीत.

सोशल मिडियावर सेलिब्रिटींपासून ते चाहत्यांपर्यंत सगळेचजण बॉलीवूडच्या गलिच्छ राजकारणावर बोलत आहेत. या सगळ्यात करण आणि आलियासोबतंच बॉलीवूडमधल्या अनेक मोठ्या हस्तींची नावं देखील ट्रोल केली जात आहेत. मात्र या प्रकरणा स्वरा भास्करने स्वतःचं मत मांडत करण आणि आलियाचं समर्थन करताना दिसून आली आहे.   

swara bhasker came out in defense of karan johar and alia bhatt

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुष्काळात कुणी खाईना का? ५०-६० रुपयांचे ड्रायफ्रूट्स, राईचा पर्वत करायची काय गरज? काजू-बदाम खाणाऱ्या खासदाराची प्रतिक्रिया

Asian Games: जपानमध्ये भारतीय नेमबाजांचे मोठे हाल! राही सरनोबतच्या हॉटेल बुकिंगबाबत घडला विचित्र प्रकार उघड

तिरुपतीच्या लाडूसाठी ९६ कोटींच्या भेसळयुक्त तुपाचा वापर, कंपनीच्या मालकाला ईडीने केली अटक

Latest Marathi News Update : आरबीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर बडतर्फीची कारवाई

VIDEO: 'नवरा विकला काय?' विचारणाऱ्या ट्रोलर्सवर जान्हवी किल्लेकर भडकली; म्हणाली, 'फालतू लोक...'

SCROLL FOR NEXT