Swara Bhasker trolled  Esakal
मनोरंजन

Swara Bhasker trolled: स्वराला फोटोशूट जमलं मात्र भगव्या रंगानं सगळं बिघडलं! नेटकऱ्यांच्या कमेंटनं रंगली चर्चा

Vaishali Patil

Swara Bhasker trolled for flaunting baby bump: बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही नेहमी तिच्या चित्रपटांमुळे कमी मात्र तिच्या वक्तव्यामुळे जास्त चर्चेत असते. स्वरा भास्कर ही तिच्या वक्तव्यामुळे ट्रोल देखील होते तर काही लोक तिला पाठिंबा देखील देतात.

सध्या स्वरा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. स्वराने समाजवादी पक्षाचे नेते फहाद अहमद यांच्यासोबत लग्न केलं. लग्नाच्या 3 महिन्यांनंतरच स्वराने चाहत्यांना गोड बातमी देत तिच्या गरोदरपणाची घोषणा केली. यावेळी स्वरानं काही फोटो शेयर केली होती. त्याचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

त्यातच आता अलीकडेच स्वरा भास्करने अतिशय बोल्ड ग्लॅमरस मॅटर्निटी फोटोशूट केले. या फोटोत तिने तिचा बेबी बंप फ्लाँट केला आहे.

हे फोटोशूट स्वराने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले होते. काही तासातच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र हे फोटोशूट सोशल मीडियावर शेयर करणं स्वराला चांगलचं महागात पडलं. पण स्वराचे तिच्या मॅटर्निटी शूटचे फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिला खूप ट्रोल करायला सुरुवात केली.

खरतर स्वरानं या फोटोमध्ये भगव्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. इतकच नाही तर तिच्या बॅकग्राउंडला देखील भगव्या रंगाचेच पडदे वापरण्यात आले आहे. स्वराचे हे फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिला खुप ट्रोल केले आहे.

या ड्रेस आणि फोटोची बॅकग्राउंड पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला खुप ट्रोल केलं आहे. तिच्या फोटोंवर कमेंट करतांना एका यूजरने लिहिले की, 'स्वरा बॅकग्राउंड भगव्या रंगाचा अंध भक्तांचा आणखी किती अपमान करणार?' तर दुसऱ्याने लिहिलयं की, 'ही प्रथा पूर्णपणे मूर्खपणाची आहे. हे थांबवलं गेलं पाहिजे.'


तर एका यूजरने तिला मुस्लिम धर्माची आठवण करून दिली आणि यानंतर तिने पाकिस्तानला जावं असा सल्लाही दिला. तर एकानं लिहिलयं की, 'ही सनातनी संस्कृती नाही..तुला लाज वाटली पाहिजे'. तर काहींनी तिच्या लूकचे खुप कौतुक केले आहे.

स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांनी फेब्रुवारीमध्ये कोर्ट मॅरेज केले होते. स्वरानं त्यांचा व्हिडिओ शेयर करत ही बातमी दिली होती. त्यानंतर स्वरा आणि तिचा पती फहान यांनी 6 जून 2023 रोजी त्यांच्या गरोदरपणाची घोषणा केली. स्वरा लग्नाआधीच प्रेग्नंट होती अशा अनेक चर्चा आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT