Swara Bhaskar Latest Tweet to Uber  Google
मनोरंजन

अमेरिकेत स्वरा भास्करला कार ड्रायव्हरनं लुबाडलं;सामान घेऊन झाला फरार

स्वरा भास्कर कुटुंबासोबत होळी साजरी केल्यानंतर अमेरिकेत सुट्टी एन्जॉय करायला गेली आहे.

प्रणाली मोरे

अभिनेत्री स्वरा भास्कर(Swara Bhaskar) सध्या लॉस एंजेलिसमध्ये आहे. पण पांढरपेश्या अमेरिकेत तिला खूप वाईट अनुभव आल्याचं तिचं ट्वीट सध्या व्हायरल होत आहे. तिला चक्क अमेरिकेत दिवसाढवळ्या चोरीचा अनुभव आला आहे. नेहमीच्या उपयोगी वस्तूंच्या ग्रोसरी शॉपिंगसाठी स्वरा गेली होती. तिथून बाहेर पडताना तिनं सामान खूप झाल्यानं कार बूक केली होती. आणि त्या कारच्या ड्रायव्हरनेच तिचा घात केला. (Swara Bhaskar Latest Tweet to Uber)

स्वरानं तिच्यासोबत घडलेला तो प्रसंग ट्वीटच्या माध्यमातून सांगितला आहे. तिनं लिहिलंय,''तिनं हे ट्वीट खास Uber Cab ची सेवा देणाऱ्या कंपनीसाठी लिहिलं आहे. तिनं स्पष्ट लिहिलंय, उबेर कंपनीनं कृपया माझी ही तक्रार नोंदवून घ्या. तुमचा एक ड्रायव्हर माझं सर्व सामान घेऊन फरार झाला आहे. तुमच्या अॅपवर तक्रार करण्यासाठी कुठलीच सोय नाही आहे. हे काही मी चुकून विसरले वगैरे नाही. तर तो चक्क माझं सामान घेऊन पळाला आहे''. या स्वराच्या ट्वीटला कंपनीकडनं उत्तर आलंय,जे बहुधा आधीच रेकॉर्डेड मेसज असावा. त्यात म्हटलंय,''तुमच्यासोबत जे घडलं यासाठी आम्ही दिलगीर आहोत. पण निश्चितच आमच्या कंपनीच्या इतिहासात असं घडलेलं नाही. आम्ही तुमची तक्रार नोंदवून घेत आहोत,आणि लवकरच आमच्याकडून ह्या तक्रारीची चौकशी होईल आणि तुम्हाला संपूर्ण सहकार्य करण्याचा प्रयत्न केला जाईल''.

कुटुंबासोबत होळी साजरी केल्यानंतर स्वरा अमेरिकेला गेली आहे. तिनं आपल्या ट्रॅव्हल एक्सपीरियन्सचे अनेक फोटो शेअर केले आहेत. स्वराची 'शीर कूर्मा' शॉर्ट फिल्म लवकरच रीलीज होणार आहे. यात शबाना आझमी आणि दिव्या दत्ता आहेत. फराझ अरिफ अन्सारी यांनी या शॉर्ट फिल्मचं दिग्दर्शन केलं आहे. ही एक लव्ह स्टोरी आहे. अनेक फिल्म फेस्टिव्हल मधून या शॉर्ट फिल्मला भरपूर पसंती मिळाली आहे. 'जहॉं चार यार' सिनेमाचं शूटिंगही स्वरानं पू्र्ण केलंय. मेहेर वीज,शिखा तल्सानिया,पूजा चोप्रा स्वरासोबत या सिनेमात दिसणार आहेत. कमाल पांडेनं या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. चार लग्न झालेल्या मैत्रिणींची ही स्टोरी आहे. गोवा ट्रीपच्या अॅडव्हेंचरस एक्सपीरियन्सवर हा सिनेमा बेतलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Graded Driving License: काय आहे ग्रेड आधारित ड्रायव्हिंग लायसन्स? वाहतूक नियम भंग केल्यास रद्द होणार; नितीन गडकरी यांची घोषणा!

Latest Marathi News Live Update : आटपाडीचे पंचायत समितीचे नूतन सदस्य तृतीयपंथी दिलीप हेगडे यांचे हृदयविकाराने निधन

Gold Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठा बदल! महाराष्ट्रात 1 तोळ्याचा भाव किती? पाहा आजचा ताजा भाव

Chandra Grahan 2026: गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या वेळी 'या' गोष्टी टाळाव्यात

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानकडून अफगाणिस्तानविरुद्ध 'थेट युद्धा'ची घोषणा; काबुल आणि कंदहारमध्ये हवाई हल्ले

SCROLL FOR NEXT