sambhaji movie
sambhaji movie sakal
मनोरंजन

संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास आता चित्रपट रूपात...

नीलेश अडसूळ

नाटक असो मालिका किंवा चित्रपट. मनोरंजन विश्वात ऐतिहासिक विषयांना विशेष पसंती मिळते. आपल्या प्रांतासाठी, देशासाठी, स्वातंत्र्यासाठी लढलेल्या या वीरांचे चरित्र पाहण्यात प्रत्येकालाच विशेष रुची असते. अशीच एक मालिका काही वर्षांपूर्वी झी मराठी (zee marathi) वाहिनीवर होऊन गेली. ज्या मालिकेने छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास जगासमोर आणला. संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी घेतलेले कष्ट आणि त्यांचे बुद्धीचातुर्य या मालिकेमुळे घराघरात पोहोचले. तीच 'स्वराज्य रक्षक संभाजी' (swarajya rakshak sambhaji) मालिका आता चित्रपट रूपात येणार आहे.

या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले. या मालिकेमध्ये डॉ. अमोल कोल्हे (amol kolhe) यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतून आपली जबरदस्त छाप पाडली. संभाजी राजांच्या पराक्रमाचे आणि बुद्धीचातुर्याचे अनेक दाखले प्रेक्षकांनी या मालिकेतून जाणून घेतले. सुरुवातीपासूनच या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतले. मालिकेतील प्रत्येक पात्र संभाजी महाराजांचा इतिहास प्रेक्षकांच्या डोळ्यांपुढे उभा करण्यात यशस्वी झाले. संभाजी महाराजांचा खरा इतिहास या मालिकेने जगासमोर आणला. म्हणूनच प्रेक्षक आजही या मालिकेची वाट पाहत आहेत. म्हणूनच १ मे महाराष्ट्र दिनापासून पुन्हा एकदा संभाजी महाराजांचा सुवर्ण इतिहास आपल्याला अनुभवता येणार आहे.

खास तंत्रज्ञान वापरून या मालिकेचे एका चित्रपटात रूपांतर करण्यात आले आहे. या माध्यमातून मालिकेतील प्रमुख प्रसंग, घटना चित्रपट स्वरूपात दाखवण्यात येतील. १ मे पासून मे महिन्यातील प्रत्येक रविवारी दुपारी १२ वाजता याचे प्रक्षेपण झी मराठी वाहिनीवर करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT