swatantryaveer savarkar movie MNS amey khopkar jumps in mahesh Manjrekar-Randeep Hooda controversy SAKAL
मनोरंजन

Swatantryaveer Savarkar: "सावरकरांवर हक्क गाजवला तर.. " मांजरेकर-रणदिप हुडा वादात मनसेची उडी, दिला इशारा

मनसे नेते अमेय खोपकरांनी ट्विटरवर पोस्ट करुन वीर सावरकर सिनेमाबद्दल इशारा दिलाय

Devendra Jadhav

सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारीत स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. वीर सावरकर सिनेमात रणदीप हुडा स्वातंत्र्यवीर सावरकरांची भुमिका साकारत आहे.

काहीच दिवसांपुर्वी सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. सिनेमाच्या टीझरपासुनच प्रेक्षकांच्या मनात सिनेमाविषयी उत्सुकता आहे.

अशातच सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. नुकतंच महेश मांजरेकरांनी रणदीप हुडाने सिनेमाच्या प्रक्रियेत ढवळाढवळ केल्याचा खुलासा केला. अशातच मनसे नेते अमेय खोपकरांनी आता थेट रणदीप हुडालाच इशारा दिलाय

(swatantryaveer savarkar movie MNS amey khopkar jumps in mahesh Manjrekar-Randeep Hooda controversy)

अमेय खोपकरांचा थेट रणदीप हुडाला इशारा

MNS नेते अमेय खोपकरांनी ट्विटरवर पोस्ट लिहून इशारा दिलाय. अमेय खोपकर लिहीतात, हिंदूहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनपट हिंदी भाषेतून जगभरात प्रदर्शित होणं ही तमाम सावरकरप्रेमींसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

लंडनमध्ये म्हणजेच थेट इंग्रजांच्या भूमीत इंग्रजांना आव्हान देऊन स्वातंत्र्यवीरांनी समस्त जगाला अचंबित केलं होतं.

अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये त्यांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. तरीही शेवटपर्यंत ते ब्रिटीशांपुढे झुकले नाहीत. भारतमातेला ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं अशा स्वातंत्र्यवीरांची धगधगीत गाथा मोठ्या पडद्यावर पाहण्याची मोठी उत्सुकता आहे.

वाद ताबडतोब थांबला अन्यथा...

अमेय खोपकर यांनी पुढे इशारा दिलाय की, "प्रदर्शनापूर्वी मात्र आता स्वामित्वहक्कांवरुन वाद सुरु झाला आहे, जो अतिशय दुर्दैवी आहे. हा वाद ताबडतोब थांबायला हवा, कारण यामुळे चित्रपट प्रदर्शनाला विलंब झाला तर तो खुद्द स्वातंत्र्यवीरांचा अपमान असेल.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर हक्क गाजवण्याचा प्रयत्न कुणीही करु नये. हा वाद त्वरित मिटवण्यात यावा आणि स्वातंत्र्यवीरांचं कार्य घराघरात पोचावं ही आमची भूमिका आहे. आम्ही दिलेल्या इशाऱ्याचा आपण योग्य आदर राखाल अशी आमची अपेक्षा आहे."

महेश मांजरेकरांनी रणदीपमुळे वीर सावरकर सिनेमाचं दिग्दर्शन सोडलं

महेश मांजरेकर म्हणाले की, मी या चित्रपटाचा खूपच गांभीर्यानं विचार करत होतो. मला तो काही केल्या पूर्णही करायचा होता. मात्र रणदीपनं त्याची चित्रपटातील लुडबूड काही थांबवली नाही. तो बऱ्याच गोष्टींमध्ये त्याची मतं देऊ लागला. आणि मला ते खटकू लागलं. यामुळे मग मी हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला. असे मांजरेकरांनी यावेळी सांगितले.

रणदीपनं या चित्रपटामध्ये खूप सारे बदल करण्याची सुचन केली. मला ते बदल करावेसे वाटले नाहीत. त्याच्या दृष्टीनं ते महत्वाचे होते. मुळात जर कथानकावर अमूक एखाद्या गोष्टीचा परिणाम होत असेल तर त्या बदलल्या तर आपण समजू शकतो. पण त्याचा कोणताही परिणाम होत नाही म्हटलं तरीही त्या बदलून आपण वेळ आणि पैसा दोन्हीही व्यर्थ करतो. असे माझे मत होते. मांजरेकर यांनी या शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT