Swwapnil Joshi  Instagram
मनोरंजन

स्वप्निल जोशीने खरेदी केली महागडी कार; रितेश म्हणाला..

सोशल मीडियावर शेअर केले फोटो

स्वाती वेमूल

मराठीतील लोकप्रिय अभिनेता स्वप्निल जोशीने Swwapnil Joshi नुकतीच आलिशान महागडी कार खरेदी केली. या कारसोबतचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. कार खरेदी केल्यानंतर स्वप्निलने पत्नी लीना जोशी आणि कुटुंबीयांसोबत छोटी पूजा केली. सोशल मीडियावर त्याच्या या फोटो आणि व्हिडीओवर सेलिब्रिटींपासून सर्वसामान्यांपर्यंत अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

'Puma ची गाडी आली. The JAGUAR I-PACE all Electric, बाप्पा मोरया', असं कॅप्शन देत त्याने हा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला आहे. स्वप्निलने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त त्याने स्वत:लाच ही गाडी भेट म्हणून दिली आहे. इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी कमेंट्स करत स्वप्निलला शुभेच्छा दिल्या आहेत. अमेय वाघ, सुयश टिळक, सुबोध भावे, भरत जाधव, अमृता खानविलकर, प्रार्थना बेहरे, मुक्ता बर्वे, पूजा सावंत, सोनाली खरे, संदीप पाठक, श्रेया बुगडे, रितेश देशमुख यांसारख्या कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. 'भारी आहे', असं सुबोधने लिहिलं, तर 'वाह, मस्त.. खूप खूप शुभेच्छा', अशी कमेंट भरत जाधवने केली. 'कार खूप सुंदर आहे, खूप खूप शुभेच्छा भाऊ', असं रितेशने लिहिलं.

'चला हवा येऊ द्या' या शोमधून गेले काही दिवस स्वप्निल प्रेक्षकांच्या भेटीला येत होता. स्वप्निलचा 'बळी' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यामध्ये स्वप्निल बळी विधूरच्या भूमिकेत दिसणार आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : काळजी घ्या, सगळं ठरल्याप्रमाणं होईल! जरांगेंना भेटताच विखे पाटलांनी दिली सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती

Marathwada Rain Forecast : मराठवाड्यात आजपासून वादळासह पावसाची शक्यता, तापमानात एक ते दोन अंशाने वाढ

Numerology: 'या' मूलांकाच्या मुली सासरी घेऊन येतात अखंड समृद्धी! पाहा कोणत्या मूलांकाची मुलगी सासरसाठी ठरते लक्ष्मी?

Marathi News Live Updates : आशियाई क्रीडा स्पर्धेत एलावेनिल वलारिवानने जिंकलं रौप्य पदक

Raju Shetti Sugarcane FRP : 'स्वाभिमानी'ची नेहमीची भूमिका बदलली! राजू शेट्टी पहिल्यांदाच समतोल भूमिका घेत कारखानदारांच्या भेटीला; नेमक्या मागण्या काय?

SCROLL FOR NEXT