Suvrat Joshi Viral  Esakal
मनोरंजन

Suvrat Joshi: 'अरे श्रावण आहे अन् तू...' अभिनेत्याचा वेगवेगळ्या प्रकारचे किडे खातानाचा व्हिडिओ व्हायरल..

Vaishali Patil

Suvrat Joshi Viral: सध्या अभिनेत्री सुष्मिता सेनच्या 'ताली' या वेबसीरीजची प्रचंड चर्चा होत आहे. रवी जाधव दिग्दर्शित 'ताली' वेबसीरीज अनेक मराठी कलाकारांनी महत्वाच्या भुमिका साकारल्या आहेत. त्यातच वेबसीरीजमधील मराठमोळ्या सुव्रत जोशीने देखील कमालिची भूमिका साकारली आहे. त्याच्या भुमिकेला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले आहे.

'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या सुव्रतने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भुमिका साकारल्या आहेत. मात्र त्याच्या या भुमिकेने त्याच्या लोकप्रियतेत आणखीच वाढ केली आहे.

सुव्रत जोशी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सध्या विदेश दौऱ्यावर आहे. त्याने तिथला एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे ज्याने सर्वांनचे लक्ष वेधून घेतलं आहे. सुव्रतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत त्याने असं काही केलयं की नेटकरी त्याला भन्नाट कमेंट करत तसं काही पुन्हा न करण्याचा सल्ला देत आहे.

सुव्रतने शेयर कलेल्या या व्हिडिओत तो वेगवेगळ्या प्रकारचे किडे खातांना दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटी त्याने कोणते किडे खाल्ले आहेत ते देखील तो सांगत आहे.

नाकतोडे, रातकिडे, रेशीमकिडे आणि बरचं त्याने खाल्ले आहे. व्हिडिओत ती व्यक्ती त्याला किड्यांची डिश बनवून देत आहे.

त्यावर त्याने लिहिल की, ' प्रोटिन भरपुर खाल्याने किडकिडीत मी कधीच नव्हतो अंगातले किडे काही कमी होते का म्हणुन म्हटलं आज खरे किडे खाऊन बघावे ...'

तर व्हिडिओ शेअर करत सुव्रत कॅप्शनला लिहिलं, “हा जेवणाचा व्हिडिओ जेवताना बघू नये. किड्यामुंगीसारखे जगण्यापेक्षा कधीतरी त्यांना खाऊन बघावे म्हटलं. खाताना आधी हातापायाला मुंग्या आल्या आणि नंतर डोक्यात भुंगा. किडे खाऊन मी माती खाल्ली का?”

आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्याच्या चाहत्यांसोबत अनेक कलाकरांनीही त्याला कमेंट केल्या आहेत.

आशय कुलकर्णीनं लिहितो की, “छान चाललाय श्रावण, मी असं ऐकलंय तिथे पालीची कोशिंबीर अप्रतिम मिळते.” त्यावर सुव्रतनेही त्याला रिप्लाय देत त्याच्यासाठी पार्सल घेतलं आहे असं लिहिलयं.

तर एका नेटकऱ्यांने लिहिलयं, "खरं सांग रील शूट करून घशात बोटं घालून उलट्या केल्यास ना" एकानं लिहिलयं, 'सिरियली, तू असं कसं करु शकतोस..' एक म्हणतो की, "इतकी काय वाईट परिस्थीती आली होती किडे खावे लागले".

तर एकानं सुव्रतची खिल्ली उडवत लिहिलयं की, "इतकं श्रीमंत व्हा की परदेशात जाऊन किडेमुंग्या खाता येतील." सुव्रतच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. काहींनी फनी कमेंट केल्या तर काहींनी त्याला ट्रोलही केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT