Taapsee Pannu Latest News Taapsee Pannu Latest News
मनोरंजन

Taapsee Pannu : आधी रिसर्च करा, मग प्रश्न करायला या; तापसी पन्नू पत्रकारावरच चिडली

तापसी पन्नूचे चाहते अभिनेत्रीच्या उत्तराचे कौतुक करत आहेत

सकाळ डिजिटल टीम

Taapsee Pannu Latest News तापसी पन्नू ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी कधीही एखाद्या विषयावर बोलण्यास मागेपुढे पाहत नाही. तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला तर धडा शिकवते. आता तापसीचा (Taapsee Pannu) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती ‘आधी रिसर्च करा आणि मग मला प्रश्न करायला या’, असे पत्रकाराला (Journalist) म्हणताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तापसी पन्नू आधी सगळ्यांना ओरडून सांगते की, भाऊ ओरडू नको. मग हेच लोक म्हणतील की अभिनेत्रीची वर्तणूक चांगली नाही. यानंतर एका पत्रकाराने तापसीला ‘दोबारा’ चित्रपटाला मिळालेल्या नकारात्मक मोहिमेबद्दल विचारले. तापसी म्हणाली, ‘कोणत्याही चित्रपटाबद्दल असे घडले नाही?’ पत्रकाराने तापसीला (Taapsee Pannu) आणखी काही प्रश्न विचारण्यास सुरुवात केली तेव्हा तापसी म्हणाली, ‘तुम्ही माझ्या प्रशाचे उत्तर द्या, मग मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईन. कोणत्या चित्रपटाबद्दल असे झाले नाही?’

समीक्षकांनी चित्रपटाविरोधात नकारात्मक प्रचार केला, असा पत्रकार म्हणाला. तेव्हा अभिनेत्री तापसी पन्नू म्हणाली, ‘प्रश्न विचारण्यापूर्वी थोडा गृहपाठ केला असता.’ पत्रकाराने (Journalist) पुन्हा प्रश्न केला तेव्हा तापसी म्हणाली की, ‘आधी रिसर्च करा आणि मग मला प्रश्न करायला या.’ या व्हिडिओवर मिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

तापसी पन्नूचे चाहते अभिनेत्रीच्या उत्तराचे कौतुक करत आहेत. त्याचवेळी तापसीची ही शैली काही लोकांना आवडली नाही. रिव्ह्यू ऐकण्याची हिंमत नसताना तुम्ही चित्रपट का बनवता, अशी टिप्पणी कुणीतरी केली. ही उत्तर देण्याची योग्य पद्धत नाही, असे एकाने लिहिले. हा प्रकार ओटीटी प्ले अवॉर्ड्समध्ये (OTT Play Awards २०२२) घडला.

ओटीटी प्ले अवॉर्डने सन्मानित

तापसीचा दोबारा हा चित्रपट अनुराग कश्यपने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाची संकल्पना टाइम ट्रॅव्हलिंगची होती. चित्रपटात तापसीशिवाय पावेल गुलाटी मुख्य भूमिकेत होता. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. तापसीचा हा चित्रपट चालला नसला तरी हसीन दिलरुबा या चित्रपटासाठी अलीकडेच तापसीला ओटीटी प्ले अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.

आगामी चित्रपट

तापसीचे अनेक चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी तयार आहेत. जन गण मन आणि ब्लर या तमिळ चित्रपटात ती दिसणार आहे. हिंदीत ती डंकी या चित्रपटात दिसणार आहे. डंकीचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. यात तापसीसोबत शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT