taapsee pannu  
मनोरंजन

प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या तापसीने फ्लॉप चित्रपटाने केली सुरुवात

वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच असते चर्चेत

स्वाती वेमूल

अभिनेत्री तापसी पन्नूने दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. अमिताभ बच्चनपासून ऋषी कपूरपर्यंत तापसीने अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलंय. बॉलिवूडमध्ये येण्याआधी तापसीने दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही नाव कमावलं. चित्रपटांसोबत तापसी तिच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. (taapsee pannu birthday special lesser known facts about her slv92)

शीख कुटुंबात झाला जन्म

तापसीचा जन्म १ ऑगस्ट १९८७ रोजी दिल्लीतील एका शीख कुटुंबात झाला. तापसीचे वडील दिल मोहन हे व्यावसायिक असून आई निर्मलजीत पन्नू या गृहिणी आहेत. वयाच्या आठव्या वर्षापासून तापसीने भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेतलं. आठ वर्षांपर्यंत तिने नृत्याचं शिक्षण घेतलं. तापसी ही उत्तम स्क्वाशपटूसुद्धा आहे. तिने दिल्लीतच तिचं शिक्षण पूर्ण केलं असून घरात तापसीला प्रेमाने 'मॅगी' म्हणून बोलवलं जातं.

टॅलेंट शोसाठी दिलं होतं ऑडिशन

'गेट गॉर्जियस' या टॅलेंट शोसाठी तिने ऑडिशन दिलं होतं. या ऑडिशनमध्ये तापसीची निवड झाली आणि तिने मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली.

तेलुगू चित्रपटापासून सुरुवात

२०१० साली तापसीने तेलुगू चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. तापसीने तिच्या करिअरमध्ये विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दाक्षिणात्य चित्रपटांनंतर तापसीने २०१३ साली 'चश्मेबद्दूर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र हा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला. मात्र इथेच हार न मानता तापसीने संघर्ष केला.

अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये केलं काम

तापसीला 'पिंक' या चित्रपटामुळे विशेष ओळख मिळाली. या चित्रपटात एकट्या तापसीची मुख्य भूमिका नव्हती. तिच्यासोबत इतरही दोन अभिनेत्री आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी भूमिका साकारल्या होत्या. मात्र त्यातही तापसीने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं. तापसीने आतापर्यंत 'बेबी', 'नाम शबाना', 'सूरमा', 'द गाझी अटॅक', 'मनमर्जियाँ', 'बदला', 'मुल्क', 'सांड की आंख' आणि 'थप्पड' या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

बॅडमिंटनपटू मॅथिअस बोए याला करतेय डेट

माजी बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक मॅथिअस बोए याला तापसी डेट करतेय. या दोघांच्या मालदीव व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. "माझ्या आईवडिलांना पसंत नसेल अशा मुलाशी मी लग्न करू शकत नाही. मी ज्यांना आतापर्यंत डेट केलंय, त्यांना मी ही गोष्ट स्पष्टपणे सांगितली होती. कारण माझ्या डोक्यात सतत हा विचार असतो की, जर मी त्या मुलाशी लग्न करू शकले, तरच मी त्यावर डेटिंगसाठी वेळ खर्च करू शकते. मला टाईमपास करण्यात काही रस नाही", असं तापसी 'कर्ली टेल्स'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjun Tendulkar Wedding : गणपती बाप्पाचा आशीर्वाद! अर्जुन-सानियाच्या लग्नासाठी तेंडुलकर कुटूंब पोहोचले 'खास' ठिकाणी; सचिन म्हणाला, जेव्हा मुलगा एका मुलीला घरी घेऊन येतो तेव्हा...

Romance Scam : ऑनलाइन प्रेम की गोड विष? 'I Love You' म्हणून रिकामं करत आहेत बँक अकाऊंट; रोमॅन्स स्कॅमचं 'ते' सत्य तुम्हाला रडवून टाकेल

Sangli Accused :पलूसमध्ये फसवणूक प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई; चारचाकी व शेअर मार्केट घोटाळ्यात दोघे ताब्यात

IND vs ZIM, T20 WC: संजू सॅमसनला संधी दिली जाणार का? भारतीय प्रशिक्षकाचं स्पष्ट उत्तर; म्हणाले, आमचे दोन्ही ओपनर डावखुरे आहेत...

T20 WC, IND vs ZIM: संजू सॅमसन, अक्षर पटेलचं पुनरागमन होणार, पण मग कोणाला मिळणार डच्चू? अशी असेल भारताची Playing XI

SCROLL FOR NEXT