Taapsee Pannu Google
मनोरंजन

'किसिंग सीनआधी RT-PCR Test केली होती का?' तापसीला कपिलचा सवाल

'लूप लपेटा' या आपल्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी ताहिर राज भसीनसोबत शो मध्ये आली होती.

प्रणाली मोरे

आपल्या सहज अभिनयाने तापसी पन्नूने(Tapsee Pannu)बॉलीवूडमध्ये खूप कमी कालावधीत आपलं भक्कम स्थान निर्माण केलं आहे. तापसीचा लवकरच ताहिर राज भसीनसोबत 'लूप लपेटा' हा सिनेमा आपल्या भेटीस येणार आहे. ४ फेब्रुवारीला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रीलीज होणार असल्याचं बोललं जातंय. हा एक क़ॉमेडी थ्रीलरपट आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन आकाश भाटियाने केले आहे. हा सिनेमा जर्मन फिल्ममेकर टॉम टाइक्वेरच्या १९९८ च्या 'रन लोला रन' चा हिंदी रीमेक असल्याचं बोललं जातंय. या सिनेमाची कथा खूपच इंट्रेस्टिंग आहे. ज्यात एक प्रेमिका आपल्या प्रेमीला वाचवण्यासाठी जाते आणि या दरम्यान तिला कोणकोणत्या अडचणींचा सामन करावा लागतो त्याचं एकंदरीत चित्रण या सिनेमाच्या कथानकाच्या माध्यमातून करण्यात आलं आहे.

नुकतंच 'लूप लपेटा' सिनेमाची संपूर्ण टीम 'कपिल शर्मा शो' मध्ये प्रमोशनसाठी आली होती. कपिल ज्या पद्धतीनं आपल्या विनोदी शैलीत एखादी कोपरखळी मारून आलेल्या गेस्टला क्लीन बोल्ड करतो ते पहाण्यासारखे असते. 'लूप लपेटा' या सिनेमात तापसी आणि ताहिरचा एक किसिंग सीन आहे. त्यावरून कपिलनं ताहिर आणि तापसीला प्रश्न केला की,''तुम्ही RT-PCR Test केली होती का? की किसिंग आधी व नंतर तुमचे ओठ सॅनीटाईज केले होते?'' आता या कपिलच्या प्रश्नावर तापसी अन् ताहिरला काय बोलावे ते दोन मिनिट सुचेना पण ताहिरनंही आपल्या पद्धतीनं पलटवार केला. या शो मध्ये तापसीनं एक गोष्ट मात्र महत्त्वाची सांगितली की,''मी जेवढा वेळ प्रमोशनसाठी देते तेवढ्या वेळात मी पाच सिनेमांचं शूट पूर्ण करेन''. कपिलच्या शो मध्ये किसिंग सीन वरून केला गेलेला विनोद सध्या व्हिडीओच्या माध्यमातून जोरदार व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ आम्ही इथे बातमीत जोडलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: तळेगावात रस्त्याच्या मधूनच उसळला पाण्याचा प्रचंड फवारा... सर्व भयभीत... थरारक अन् अचंबित करणारा प्रकार

पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांच्या नातवाचे कांड, परदेशी महिलांच्या व्हिसाची सोय केली, देशात येताच अपहरण अन् अत्याचार

Marathi Live Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये सुपारी हनुमान मंदिरात घंटानाद आंदोलन

IND vs ENG: 'त्या एका षटकाने सामना फिरला'; पराभवानंतर श्रेयस अय्यरचं मोठं वक्तव्य, रवी बिश्नोईबाबत काय म्हणाला?

Ayodhya Ram Mandir: राममंदिरासाठी ‘सीईओं’ची नियुक्ती शक्य; ट्रस्टची सोमवारी बैठक; ‘एसआयटी’ अहवालावरही चर्चा

SCROLL FOR NEXT