Taapsee Pannu news  esakal
मनोरंजन

Taapsee Pannu: 'माझी सेक्स लाईफ...' काय बोलून गेली तापसी पन्नु!

आपल्या हटक्या स्वभावामुळे आणि परखड बोलण्यामुळे प्रसिद्ध असणारी तापसी ही सध्याच्या घडीला बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.

युगंधर ताजणे

Bollywood Actress Taapsee Pannu: आपल्या हटक्या स्वभावामुळे आणि परखड बोलण्यामुळे प्रसिद्ध असणारी तापसी ही सध्याच्या घडीला बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित दोबारामध्ये ती प्रमुख (Bollywood news viral) भूमिकेत आहे. तापसी दोबाराचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. अशावेळी तिला बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता करण जोहरनं तिला आपल्या शो (Karan Johar) मध्ये बोलावले होते. यावेळी तापसीनं त्याला नकार दिला. नकार देण्याचे कारण तिनं जेव्हा सांगितले तेव्हा मात्र तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. तापसीनं केलेलं वक्तव्य त्यांना चक्रावून टाकणारे होते. यापूर्वी देखील तापसी तिच्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे चर्चेत आली होती.

बॉलीवूडमधील वादग्रस्त आणि कायम नेटकऱ्यांच्या रडारवर असणाऱ्या सेलिब्रेटी कोण असा प्रश्न विचारल्यास दोन नावं समोर येतात. ती म्हणजे कंगना रनौत आणि तापसी पन्नु. तापसीकडे सध्या अनुराग कश्यपचा मोठा प्रोजेक्ट असून त्याच्या प्रमोशनसाठी ती वेगवेगळ्या शोमध्ये दिसून येत आहे. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येतो आहे. त्याचे दिग्दर्शन अनुरागनं केलं आहे. दरम्यानं तिला प्रमोशनसाठी करण जोहरच्या शो मध्ये सहभागी होणार का असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी तिनं जे उत्तर दिलं ते करणला देखील चक्रावून टाकणारं होतं.

आपल्याला त्या शोमध्ये जायचं नाही. करणनं बोलावणं काही धाडलेलं नाही. आणि तशीही माझी सेक्स लाईफ काही फार मजेशीर नाही. त्यामुळे मला त्या शोमध्ये जाण्यात काहीही रस नाही. अशा शब्दांत तिनं करणला टोमणा मारला आहे. तापसीनं अशी प्रतिक्रिया देण्यामागील कारण म्हणजे करण या शोमध्ये सहभागी होणाऱ्या सेलिब्रेटींना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जास्त प्रश्न विचारतो. त्यांच्या सेक्स लाईफवरुन देखील त्यानं प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे तापसीनं तो संदर्भ लक्षात घेऊन करणला खडे बोल सुनावले आहेत.

कॉफी विथ करणच्या 7 व्या पर्वामध्ये जितके सेलिब्रेटी सहभागी झाले आहेत त्यांनी आपल्या सेक्स लाईफबद्दल मोठे खुलासे केले आहेत. त्यामुळे त्यात येणाऱ्या नवीन कलाकारांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल रंजक माहिती द्यावी. अशी धारणा आता चाहत्यांची झाली आहे. असे तापसीला वाटते. त्यासाठी तिनं आपल्याला त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यात रस नसल्याचे तिनं म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Tensions : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आता भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका!

Midday Meal Egg Controversy : मध्यान्ह भोजनात अंडे देण्यावरून वाद...एकाच वेळी ७० पालकांनी मुलांना शाळेतून काढलं

VIRAL VIDEO: ए काय करतोयस? सेल्फी घेणाऱ्याला जया बच्चन यांनी दिला जोराचा धक्का; सगळेच अवाक, नेटकरी म्हणतात- त्याला...

Latest Maharashtra News Updates Live: वैद्यनाथ बँकेवर पंकजा मुंडेंचंच वर्चस्व

मृत्यूच्या दाढेतून परत आलेली सचिन यांची एकुलती एक लेक; "डॉक्टरांनी ती टेस्ट सांगितल्यावर मी हादरलो.."

SCROLL FOR NEXT