taapsi pannu's beatiful sister shagun 
मनोरंजन

तापसी पन्नूची बहिणही दिसते तितकीच सुंदर ; पहा फोटो

वृत्तसंस्था

मुंबई : बॉलिवूड स्टार त्यांच्या सिबलिंगसोबत खूप कनेक्ट असल्याचा प्रत्यय अनेकदा येतो. एकत्र वेकेशनला जाणे, फिरणे किंवा एकत्र मुलाखतींमध्येही बॉलिवूड स्टार बहिण किंवा भावासोबत दिसतात. अनेकदा कलाकारांच्या सिबलिंगची चर्चा बी-टाऊनमध्ये पाहायला मिळते. तापसी पन्नूला पाहिल्यावर ती किती सुंदर आहे याचा विचार तुमच्या मनात येतच असेल. पण, तुम्ही कधी तिच्या बहिणीला पाहिले आहे का? इन्स्टाग्रामवरील तिच्या फोटोंचे अनेक चाहते आहेत. शगुन पन्नू असं तिचं नाव असून तापसी एवढीच तिही 'हॉट' आणि 'क्यूट' आहे. 

शगुन अनेकदा तिची लाडकी बहिण तापसीसह फोटो शेअर करताना दिसते. तापसीचंही छोट्य़ा बहिणीवर तितकचं प्रेम आहे आणि म्हणूनच, तिने शगुनला लाल रंगाची 'जीप' कार गिफ्ट केली. तस बघायला गेलं तर शगुन प्रसिद्धी, कॅमेरा आणि स्टारडमपासून दूर राहण्याचा प्रयत्न करते. पण, सोशल मीडियावरचे तिचे फोटो चर्चेचा विषय बनतात. 

शगुनला सोशल मीडियावर अॅक्टीव राहणे आवडते आणि त्याचसोबत भरपूर फिरणे तिचा आवडीचा छंद आहे. फिरण्याचे फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करते आणि ते 'ट्रॅवल गोल्स' असल्याचं चाहत्यांचं म्हणण आहे. 

शगुन एक वेडिंग प्लानर आहे. त्याचसोबत ती मोडलिंगच्या क्षेत्रातही पुढे आहे. तापसी आणि शगुन या पन्नू बहिणींचं एकमेकांवर किती प्रेम आहे याचा प्रत्यय त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टरवरुन येतोच. 'माझी बहिण शगुन अत्यंत लाडकी आहे' असा उल्लेख तापसी अनेकदा करते. तापसी आणि शगुन मुलाखतीमधून अनेकदा एकत्र दिसले आहेत.     

तापसी पन्नूने 2010 मध्ये तिच्या करीअरला सुरुवात केली. तिने तमिळ आणि मल्याळी सिनेमांमधून ती झळकली. 'चष्मे बद्दूर' या चित्रपटासह तिनं 2013 ला बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. नाम शबाना, मनमर्जीयां, गेम ओव्हर असे अनेक सिनेमे तिने केले. 'पिंक' या चित्रपटाने तापसीला खरी ओळख मिळाली. दिसायला अतिशय सुंदर पण तितकीच स्पष्ट बोलणारी अशी ही अभिनेत्री. आपली मते परखडपणे मांडते आणि तिच्या वागणंही काहीसं 'दबंग' असचं आहे. तापसीचा 'सांड की आंख' हा चित्रपट येत्या दिवाळीत म्हणजेच 25 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 1st T20I: इशान किशनचं पुनरागमन होणारच, पण मग संजू सॅमसनचं स्थान धोक्यात? कर्णधार सूर्यकुमारने स्पष्टच सांगितलं...

मावस बहिणीच्या दिरासोबत रिलेशनशिपमध्ये होती अनुश्री माने; लग्नही ठरलेलं... पण ब्रेकअपची झालेली जोरदार चर्चा कारण

Latest Marathi News Live Update : २३ जानेवारी रोजी पुणे शहरातील शाळांना सुट्टी

Dhule Municipal Election : धुळ्यात भाजपचा 'मास्टरस्ट्रोक' यशस्वी! ३१ प्रस्थापितांना डच्चू देऊनही सत्तेचा मार्ग मोकळा

एकेकाळी पुण्यातील छोट्याशा चष्म्याच्या दुकानात नोकरी करायची 'ही' अभिनेत्री ; आता बॉलिवूडमध्येही कमावलंय नाव

SCROLL FOR NEXT