dilip joshi,raj anadkat file photo
मनोरंजन

'तारक मेहता'मधील टप्पू-जेठालालमध्ये वाद; दिलीप जोशी म्हणाले..

सेटवर दिलीप जोशी आणि राज अनाडकत यांच्यात वादाच्या चर्चा

प्रियांका कुलकर्णी

गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा' Taarak Mehta Ka Ooltah Chashmah. या मालिकेमधील प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. काही दिवसांपूर्वी शोमधील टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनाडकत Raj Anadkat आणि जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी Dilip Joshi यांच्यामध्ये वाद आहेत अशी चर्चा सुरू होती. मालिकेच्या शूटिंगसाठी राज सेटवर उशिरा येत होता. त्याचप्रमाणे दिलेले संवाद नीट तो नीट पाठ करत नव्हता, त्यामुळे शूटिंग उशिरा होऊ लागलं. या सर्वांचा त्रास दिलीप जोशींना होऊ लागला, अशी चर्चा होती. या सर्व वादावर आता दिलीप जोशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (taarak mehta ka ooltah chashmah actor dilip joshi responds to tiff with raj anadkat)

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिलीप यांनी या सर्व चर्चा खोट्या असल्याचं स्पष्ट केलं. 'हे सर्व खोटं आहे. कोण या अफवा पसरवत आहे', असं ते म्हणाले.

या मालिकेबद्दल अनेक गोष्टींची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. प्रेक्षक या मालिकेच्या बदललेल्या कलाकारांवर आणि गुणवत्तेवरदेखील कमेंट्स करत आहेत. या विषयी बोलताना दिलीप यांनी सांगितले, 'जेव्हा प्रमाण पाहिले जाते तेव्हा गुणवत्तेकडे दुर्लक्ष होते.आधी ही मालिका एक आठवड्याचीच होती. तेव्हा मालिकेच्या लेखकांकडे खूप वेळ होता. तेव्हा ते चार एपिसोड लिहायचे मग बाकीचे चार एपिसोड पुढच्या महिन्यामध्ये शूट करायचे. आता लेखकावर रोज नवीन एपिसोडसाठी काम करण्याचा दबाव असतो. त्यामुळे प्रत्येक दिवशी त्यांना नवीन विषय शोधावा लागतो.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT