मनोरंजन

तारक मेहतामधील 'हा' अभिनेता होता कोई मिल गयातील 'जादू'

बॉलीवूडमध्ये bollywood असे काही चित्रपट आहेत ज्यांचा प्रभाव अजूनही प्रेक्षकांच्या मनावर आहे.

युगंधर ताजणे

बॉलीवूडमध्ये bollywood असे काही चित्रपट आहेत ज्यांचा प्रभाव अजूनही प्रेक्षकांच्या मनावर आहे. कोई मिल गया koi mil gaya हा ऋतिक रोशनचा hritik roshan गाजलेला चित्रपट या चित्रपटानं ऋतिकला स्टार बनवलं. त्याच्या नावाला वेगळं ग्लॅमर मिळण्यात कोई मिल गया आणि त्यातील जादूचा मोठा वाटा आहे. वास्तविक स्टिव्हन स्पिलबर्गच्या एका चित्रपटावर आधारित हा चित्रपट होता. त्यात हिंदी मसाला टाकून त्याला वेगळी फोडणी देऊन तो प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आला होता. आता यासगळ्याची चर्चा करण्याचे कारण म्हणजे त्या चित्रपटात जो जादू होता त्याची भूमिका सध्याच्या आघाडीच्या मालिकेतील एका अभिनेत्यानं केली होती ही आहे.

तुम्हाला तारक मेहता का उल्टा चष्मा नावाची मालिका माहिती असेल त्यातील एका अभिनेत्यानचं कोई मिल गया मधील जादूची भूमिका केली होती. सध्या सोशल मीडियावर ही माहिती चर्चेचा विषय ठरत आहे. ऋतिकला त्याच्या या चित्रपटातील भूमिकेसाठी अॅवॉर्डही मिळाला होता. त्यामुळे प्रेक्षकांच्या खास आठवणी या चित्रपटाविषयीच्या आहे. त्यात ऋतिकचा अभिनय, त्याचा डान्स, संवाद आणि अॅक्शन यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्वांनाच तेव्हा कोई मिल गयानं वेड लावलं होतं.

ऋतिकच्या जोडीला त्या चित्रपटामध्ये अभिनेत्री प्रीती झिंटा, रेखा दिसल्या होत्या. कोई मिल गया या चित्रपटाला प्रदर्शित झालेल्याला 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतातील साय फाय चित्रपटांपैकी एक प्रमुख चित्रपट म्हणून कोई मिल गयाचे नाव घ्यावे लागेल. या चित्रपटामध्ये जादू आणि त्याची भूमिका हा चर्चेचा विषय होता. ही भूमिका इंद्रवदन पुरोहितनं केली होती. की जो आता तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये काम करणारा अभिनेता आहे. या मालिकेमध्ये त्यानं दया बेन उर्फ दिशा वकानीच्या लांबच्या नातेवाईकाची भूमिका साकारली आहे.

याशिवाय इंद्रवदननं काही चित्रपट आणि मालिकांमध्येही काम केलं आहे. ते दिव्यांग आहेत. मात्र असे असताना देखील त्यांनी साकारलेल्या भूमिका या प्रेक्षकांच्या मनात राहणाऱ्या आहेत. त्यांनी आतापर्यत 60 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ते काम करत असलेल्या तारक मेहता का उल्टा चष्मा नावाच्या मालिकेनं देखील 13 वर्षे पूर्ण केली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ जुलै २०२६

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Loan Waiver : शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर! 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांचा समावेश; तुमचे नाव 'या' पोर्टलवर करा चेक

Ashadhi Ekadashi : महापूजेवेळीही भाविकांसाठी श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सुरू; पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून 20 किमी अंतरावर, पंढरपुरात 30 लाखांहून अधिक भाविकांचा महापूर

SCROLL FOR NEXT