Bhavya Gandhi and Samay Shah
Bhavya Gandhi and Samay Shah 
मनोरंजन

'टप्पू'च्या वडिलांचं निधन; 'गोगी'ची भावनिक कविता व्हायरल

स्वाती वेमूल

'तारक मेहता का उल्टा चष्मा' Taarak Mehta Ka Ooltah Chashmah या मालिकेत 'टप्पू'ची Tapu भूमिका साकारलेला अभिनेता भव्य गांधी Bhavya Gandhi याच्या वडिलांचं कोरोनाने निधन झालं. गेल्या दहा दिवसांपासून ते रुग्णालयात कोरोनाशी झुंज होते. मालिकेत गोगीची भूमिका साकारणारा अभिनेता समय शाह Samay Shah याने विनोद गांधी यांचा फोटो पोस्ट करत त्यांच्यासाठी भावनिक कविता लिहिली. समयची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah actor Samay Shah pays tribute to Bhavya Gandhi father)

'जिसके साथ होता वो ही समझता' (ज्याच्यासोबत घडतं, त्यालाचं त्याचं दु:ख कळतं) , असं त्याने कवितेच्या सुरुवातीला लिहिलंय. या कवितेतून समयने भव्यच्या भावना व्यक्त केल्या. भव्य आणि समय हे फक्त सहकलाकार नसून चुलत भावंडंसुद्धा आहेत.

हेही वाचा : वीना मलिककडून यहुदींवरील अत्याचाराचं समर्थन; ट्विट केलं हिटलरचं विधान

विनोद यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यासाठी हॉस्पिटल बेड शोधण्यासाठीही त्यांना फार काळ लागला होता. याबाबत भव्यची आई यशोदा गांधी 'स्पॉटबॉय ई'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या, 'विनोद यांना ताप होता आणि त्यांच्या छातीतही दुखत होतं. चाचण्या आणि स्कॅन केल्यानंतर ५ टक्के संसर्गाचं निदान झालं. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्यांना घरीच विलगीकरणात ठेवलं होतं. पण हळूहळू त्यांची तब्येत ढासळत गेली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं.'

विनोद गांधी यांच्या पश्चात त्यांची पत्नी यशोदा आणि निश्चित, भव्य ही दोन मुलं असा परिवार आहे. भव्यच्या वडिलांच्या निधनाच्या वृत्ताने त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT