Taarak Mehta Ka ooltah chashmah dayaben aka disha vakani throat cancer Google
मनोरंजन

Tarak Mehta: 'तारक मेहता' फेम दिशा वकानीला गळ्याचा कॅन्सर, दयाबेनच्या आवाजानं केला घात

'तारक मेहता..' मधून दिशा वकानीनं एक्झिट घेतल्यानं तिचे चाहते नाराज होतेच,पण आता अचानक तिला कॅन्सर झाल्याचं कळताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

प्रणाली मोरे

Disha Vakani: तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत दयाबेन ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या दिशा वकानी संदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. आणि ती बातमी दिशा वकानीच्या चाहत्यांसाठी वाईट आहे. काही रिपोर्ट्सनुसार दावा केला जात आहे की दिशाला गळ्याचा कॅन्सर झाला आहे. सध्या ती या आजाराशी झुंज देत आहे.

बोललं जात आहे की गळ्याचा कॅन्सर तिला तिच्या दयाबेन या व्यक्तिरेखेमुळे झाला आहे, दिशा तारक मेहता मालिकेत एकदम वेगळ्याच आवाजात बोलायची. तो विशिष्ट आवाज ती त्या व्यक्तिरेखेसाठी काढायची. आणि त्यामुळेच गळ्याचा त्रास सुरु होऊन पुढे तिला कॅन्सरनं ग्रासलं. दिशा या आजाराशी कधीपासून लढतेय हे मात्र अद्याप कळलेलं नाही.(Taarak Mehta Ka ooltah chashmah dayaben aka disha vakani throat cancer)

दिशा वकानीनं २०१९ मध्येच मालिकेला रामराम ठोकला होता. यामागचं कारण तिनं मॅटर्निटी लीव्ह घेतली आहे असं सांगितलं गेलं होतं. त्यानंतर तिचे चाहते तिनं शो मध्ये परत यावं याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होते. मेकर्सनी शो मध्ये परत येण्यासाठी दिशाला अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न के ला. पण दिशानं प्रत्येक वेळा आपला नकारच कळवला. दिशाची 'दयाबेन' ही व्यक्तिरेखा शो मध्ये महत्त्वाची होतीच पण प्रेक्षकांची फेव्हरेटही होती.

दिशा वकानी 2010 मध्ये एके ठिकाणी दयाबेनच्या स्टाइलमध्ये बोलायला गेली तेव्हा खूप विचित्र आवाज तिनं काढला होता. तेव्हा ती म्हणाली होती,'' प्रत्येक वेळेस तसा आवाज काढणं किंवा तसं बोलणं कठीण होऊन बसतं. पण देवाची कृपा आहे माझ्या मूळ आवाजाला यामुळे अद्याप काही नुकसान झालं नाही,किंवा कधी गळ्याचा त्रासही झाला नाही''. दयाबेन या व्यक्तिरेखेसाठी दिशा दिवसातून जवळपास-११ ते १२ तास शूटिंग करायची, म्हणजे तितके तास तिला हा असा आवाज काढायला लागायचा.

जेव्हापासून दिशा वकानीनं शो सोडला आहे ,तेव्हापासून तारक मेहता मालिकेतील तिची व्यक्तिरेखाही लोकांना दिसलेली नाही, मेकर्सनी तिच्या ऐवजी नवीन अभिनेत्रींचा शोध सुरु केला होता. ऐश्वर्या सखुजा आणि काजल पिसल सारख्या अभिनेत्री दयाबेन साकारतायत अशा बातम्या कानावर पडल्या देखील होत्या. पण या सगळ्या अफवाच होत्या हे नंतर कळलं. दिशा वकानीनं मालिका सोडल्यानंतर अनेक कलाकारांनी मालिका सोडल्याचं देखील समोर आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT