disha vakani  file image
मनोरंजन

प्रसिद्ध मराठी गाण्यातील 'दयाबेन'चा डान्स पाहिलात का?

मालिकेमध्ये साधी-भोळी दिसणारी दिशा या गाण्यामध्ये बोल्ड लूकमध्ये दिसत आहे.

प्रियांका कुलकर्णी

गेली कित्येक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'. या मालिकेमधील प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. या मालिकेतील ‘दया बेन’ ही भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीच्या या मालिकेमधील अभिनयामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. दिशाने तिच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली. काही दिवसांपूर्वी दिशाने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका सोडली. सध्या ती कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. सध्या दिशाच्या एका गाण्याच्या व्हिडीओची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. मालिकेमध्ये साधी-भोळी दिसणारी दिशा या गाण्यामध्ये बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. (taarak mehta ka ooltah chashmah fame dayaben aka disha vakani bold dance in marathi song)

दिशाच्या फॅन क्लबने नुकताच तिच्या एका जुन्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिशा बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. ‘दर्या किनारे एक बंगला’ असे या गाण्याचे नाव आहे. दिशाने या गाण्यामध्ये गोल्डन कलरचा बॅकलेस टॉप घालता आहे. हे कोळीगीत असून यामधील दिशाचा लूक पाहून तिचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमध्ये दिशाचा लूक अगदी साधा होता. त्यामुळे दिशाला या गाण्यात ग्लॅमरस आणि बॉल्ड लूकमध्ये पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेमध्ये दिशाचा गरबा आणि बोलण्याची स्टाईल लोकप्रिय होती. 2008 साली 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेचा पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेमधील जेठालाल, दया, पोपटलाल, भिडे, माधवी, अय्यर, बबिता, कोमल या व्याक्तिरेखांना प्रेक्षकांची विषेश पसंती मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT