Asit Kumarr Modi On Sexual Harassment Allegations:  Esakal
मनोरंजन

Asit Modi: असित मोदीच्या अडचणी वाढण्याची शक्यता! लेखी तक्रार दाखल

Vaishali Patil

Asit Modi: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा टिव्ही मनोरंजन विश्वातील सर्वात लोकप्रिय शो आहे. सगळ्याच वर्गात या शोचे चाहते आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून हा शो अनेक वेगवेगळ्या वादांमुळे चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा शोचे निर्माते असित मोदी अडचणीत सापडला आहे.

जेनिफर मिस्त्री बन्सीवालने शोच्या निर्माते असित मोदी यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.जेनिफरने प्रोजेक्ट मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आणि मेकर्सवर लैंगिक छळाचा आरोप करत पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

जेनिफर मिस्त्रीने असित मोदींविरोधात लैंगिक छळाचा आरोप करत लेखी तक्रार दाखल केली आहे. अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, लवकरच या प्रकरणाशी संबंधित लोकांचे जबाब नोंदवले जातील.

असित मोदींशिवाय जेनिफर मिस्त्रीने सोहेल रमाणी आणि जतीन यांच्यावरही गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. अभिनेत्रीने याप्रकरणी डीसीपी झोन ​​10 यांच्याकडे लेखी तक्रारही केली आहे. पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून जबाब नोंदवले जात आहेत.

तर दुसरीकडे असित मोदी आणि त्यांच्या टिमने हे सगळे आरोप फेटाळुन लावले आहेत. याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल, असं असित मोदी यांच्या टीमचं म्हणणे आहे. तारक मेहताच्या निर्मात्यांनी तिच्या वागण्यावर आणि काम करण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict End : ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! इराण युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर, इस्रायल, यूएई, सौदीचे मानले आभार

Chhatrapati Sambhajnagar: दिवसभर उकाडा; सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी; विजांच्या कडकडाटासह शहरभर पावसाचे आगमन

Shaktipith Highway Kolhapur : शक्तिपीठ महामार्गाचा नकाशा बदलला, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, शिरोळ, हातकणंगले वगळले

Pune Rain News: पुण्याला गारांच्या पावसाचा तडाखा; मध्यवर्ती भागासह उपनगरांत नागरिकांची तारांबळ, झाडपडीच्‍या आठ घटना!

Chhatrapati Sambhajinagar: त्याने भरले बेरंगी आयुष्यात रंग!; ऑटिझमवर मात करीत स्वराज राजपूत बनला आईचा आधार

SCROLL FOR NEXT