sachin shroff  Sakal
मनोरंजन

Tarak Mehata: इथं पोपटलालला एक बायको भेटना अन् ‘तारक मेहता’ दुसऱ्या लग्नाच्या तयारीत

मालिकेत नव्या 'तारक मेहता'ची भूमिका साकारणारा अभिनेता सचिन श्रॉफ याच्याविषयी आम्ही बोलत आहोत. सचिनचं हे दुसरं लग्न आहे. वयाच्या 50 व्या वर्षी तो दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टीव्ही मालिकेत दिसणारा सचिन श्रॉफ सध्या चर्चेत आहे. काही काळापूर्वी तो या मालिकेच्या टीममध्ये सामील झाला आहे, ज्यामध्ये तो तारकच्या भूमिकेत दिसत आहे. अल्पावधीतच त्याने प्रेक्षकांची मनेही जिंकली. त्याचबरोबर आता सचिन श्रॉफने वैयक्तिक आयुष्यातही एक सुंदर निर्णय घेतला आहे.

सचिन लवकरच लग्न करणार आहे. या अभिनेत्याचे पहिले लग्न जुही परमारशी झाले होते, मात्र काही काळानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. त्याचवेळी घटस्फोटाच्या पाच वर्षानंतर सचिन दुसरं लग्न करत आहे.

टीव्ही अभिनेता सचिन श्रॉफ 25 फेब्रुवारीला वर होणार आहे. मात्र, अभिनेता कोणत्या मुलीसोबत लग्न करणार हे कोणालाच माहित नाही. सचिनने आपल्या पत्नीची माहिती गुप्त ठेवली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिनच्या एका जवळच्या व्यक्तीने सांगितले की, मुलीची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे. सर्व काही शांततेत पार पडावे असे कुटुंबीयांना वाटते.

सूत्राने पुढे सांगितले की त्याची पत्नी टीव्ही इंडस्ट्रीतील नाही. ती पार्ट टाइम इवेंट ऑर्गनाइजर आणि इंटिरियर डिझायनर आहे. ती सचिनच्या बहिणीची मैत्रीण आहे. सचिनच्या कुटुंबीयांनी काही काळापूर्वी त्याला लग्नाचा सल्ला दिला होता, त्यानंतरच त्याने आपल्या सीक्रेट पार्टनरचा विचार केला आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला.

2009 मध्ये सचिन श्रॉफने जूही परमारसोबत लग्न केले होते. दोघांनाही एक प्रेम मुलगी आहे पण जुही आणि सचिनचे नाते फार काळ टिकले नाही. 2018 मध्ये घटस्फोट घेतल्यानंतर दोघेही वेगळे झाले. यानंतर अभिनेत्याने त्याच्या व्यावसायिक जीवनावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये दिसण्यापूर्वी तो सोनाक्षी सिन्हा आणि हिमा कुरेशी यांच्यासोबत 'डबल एक्सएल'मध्ये दिसला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT