Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Jethalal Amit Bhatt esakal
मनोरंजन

TMKOC Jethalal : 'लाज कशी वाटत नाही हो म्हणायला'! जेठालालच्या पप्पांवर नेटकरी का चिडले?

तारक मेहता मालिकेतील जेठालाल आणि जेठालालचे वडील हा नेहमीच चाहत्यांच्या चर्चेचा विषय राहिला आहे.

युगंधर ताजणे

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Jethalal Amit Bhatt : टीव्ही मनोरंजन विश्वात ज्या मालिकेनं गेल्या दीड दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे त्या तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेची पुन्हा एकदा चर्चा होत आहे. या मालिकेतील कलाकार आता प्रेक्षकांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. वेगवेगळया निमित्तानं कित्येक कलाकारांनी मालिकेच्या निमित्तानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

तारक मेहता मालिकेतील जेठालाल आणि जेठालालचे वडील हा नेहमीच चाहत्यांच्या चर्चेचा विषय राहिला आहे. त्या दोघांची कॉमेडी, त्याचे टायमिंग आणि मालिकेतून प्रभावीपणे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणे यामुळे हे कलाकार कायमच चाहत्यांच्या पसंतीचा विषय राहिले आहेत. तारक मेहतावर जसा चाहते कौतूकाचा वर्षाव करतात तसेच त्या मालिकेवर कित्येकदा टीकाही होत असल्याचे दिसून आले आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

जेठालालचे वडील हे सध्या सोशल मीडियावर ट्रोलिंगचा विषय आहे. अमित भट्ट यांनी ही भूमिका साकारली असून ते एका वेगळ्या कारणामुळे नेटकऱ्यांच्या रडारवर आले आहेत. त्याचे झाले असे की, काही दिवसांपूर्वी अमित यांनी आपल्या पत्नीसमवेत एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात ते म्हणतात, चाळीशीनंतर महिला समजदार होते, पण मुद्दा हा आहे की, ती महिला चाळीशी झाली आहे हे मान्य करायला तयार होत नाही. त्यानंतर त्या व्हिडिओवरुन अमित यांना ट्रोल करण्यात आले आहे.

एकानं त्यांना त्यांच्या दातांवरुन डिवचले आहे. तुम्ही खरं सांगा, गुटखा खाता की नाही, यावर कलाकारानं प्रामाणिकपणे उत्तर देत, हो असे म्हटले आहे. त्या व्हिडिओपेक्षा नेटकऱ्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्याकडे अधिक नेटकऱ्यांचे लक्ष आहे. दुसऱ्यानं कमेंट केली आहे की, अमित सर आता तुम्ही पण म्हणा की, बोलो जुबा केसरी...सीधी बात नो बकवास... अशा प्रकारच्या प्रतिक्रियांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

काहींनी मात्र जेठालालच्या वडिलांना गांभीर्यानं काही प्रश्न विचारले आहेत. युझर्स म्हणतात, तुम्ही गुटखा खाणाऱ्यांच्या बाजूनं आहात का, तुम्हाला हो म्हणताना लाज कशी वाटत नाही. खुशाल हो म्हणताना तुम्ही गुटखा खाणाऱ्यांना आणखी प्रोत्साहित करत आहात. हे तुम्हाला कळत नाही का, असे प्रश्न काही नेटकऱ्यांनी अमित भट्ट यांना विचारले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Drought : मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्याला भाजप आमदाराची धक्काबुक्की? धाराशिवच्या व्हिडिओवरून दानवेंचा गंभीर आरोप

Ballarpur Hospital Incident : प्रसूतीदरम्यान मातेसह बालकाचा मृत्यू बल्लारपुरातील घटना; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात

Gadchiroli Collector : जिल्हाधिकाऱ्यांनी दुचाकीने केला दौरा दुर्गम भागातील रस्ते, पूल, आरोग्य, शिक्षणासह अन्य सुविधांची पाहणी

Latest Marathi News Live Update : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

Edible Oil Import Duty Cut : खाद्यतेलाचे दर उतरणार?, आयात शुल्कात मोठी कपात; सणासुदीत ग्राहकांना मोठा फायदा

SCROLL FOR NEXT