dilip joshi,raj anadkat file photo
मनोरंजन

'तारक मेहता..'मधून 'टप्पू'ची होणार एग्झिट; 'बबिता'सोबत जोडलं गेलं होतं नाव

राज २०१७ पासून 'टप्पू'ची भूमिका साकारत आहे.

स्वाती वेमूल

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या लोकप्रिय मालिकेतून आणखी एक कलाकार बाहेर पडणार आहे. या मालिकेत टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनाडकत (Raj Anadkat) ही मालिका सोडणार असल्याचं कळतंय. राजने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला असून याविषयी निर्मात्यांसोबतही बोलणं झालं आहे. त्यामुळे ख्रिसमसच्या आधीच तो त्याचं शूटिंग पूर्ण करणार असल्याचं समजतंय. याआधीही मालिकेतल्या काही कलाकारांनी ही मालिका सोडली.

'ई टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून राज ही मालिका सोडण्याच्या विचारात होता. याविषयी त्याने मालिकेच्या निर्मात्यांसोबत चर्चादेखील केली. मात्र या चर्चेतून काही निष्पन्न झालं नाही. त्यातच राजचा करार संपत आला आहे. मालिका सोडण्याची राजची इच्छा असल्याने अखेर निर्मात्यांनीही कराराचं नुतनीकरण केलं नाही. त्यामुळे राज ही मालिका सोडणार असल्याचं निश्चित झालं आहे.

गेल्या काही महिन्यांत नेहा मेहता, गुरुचरण सिंग यांनी 'तारक मेहता..' ही मालिका सोडली. त्यात आता राजचाही समावेश झाला आहे. नेहा मेहताची जागा मालिकेत सुनन्या फौजदारने तर गुरुचरण सिंगची जागा बलविंदर सिंग सोढीने घेतली. राज या मालिकेत २०१७ पासून काम करत आहे. त्याने मालिकेत टप्पूची भूमिका साकारत असलेल्या भव्य गांधीची जागा घेतली. भव्यने जवळपास नऊ वर्षे टप्पूची भूमिका साकारली होती.

'बबिता'सोबत अफेअरच्या चर्चा

मालिकेत बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ताला राज डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. या दोघांच्या वयात नऊ वर्षांचं अंतर आहे. राज २४ वर्षांचा आहे तर मुनमुन ३३ वर्षांची आहे. सोशल मीडियावरील मुनमुनच्या फोटोंवर अनेकदा राजच्या कमेंटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं होतं. मात्र या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं मुनमुनने स्पष्ट केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd ODI: रोहित शर्मा Is Best! सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांच्यानंतर परदेशात मैदान गाजवणारा तिसरा ओपनर

Maharashtra Politics : भेटींना राजकीय रंग देऊ नका; महायुती भक्कम असल्याचा कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांचा इशारा

Latest Marathi News Live Update : पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद, कारण काय?

RBI Rule: बँकेच्या चुकीमुळे तुमचे नुकसान झाले? मग ग्राहकांना मिळू शकते 33 लाखांपर्यंत नुकसान भरपाई; जाणून घ्या नियम

IND vs ENG: विराट मोडणार सचिन तेंडुलकरचा १९ वर्षांचा जुना रेकॉर्ड? जे कोणालाच जमलं नाही ते विराट करणार, पाहा नेमकं काय घडणार

SCROLL FOR NEXT