Taaza Khabar Trailer Bhuvan Bam  Esakal
मनोरंजन

Taaza Khabar Trailer: कुण्या अभिनेत्यापेक्षाही जास्त कमावतो भुवन बाम...

सकाळ डिजिटल टीम

फेमस यूट्यूबर भुवन बाम याने त्याच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. त्याच्या कॉमेडी व्हिडिओ लोकांच भरभरुन मनोरंजन करतात. त्यामूळए त्याच्या चाहत्यांची संख्याही फार आहे. तो यूट्यूबच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणाऱ्या लोकांपैकी एक आहे. 'बीबी की वाइन्स'ने त्याला प्रसिद्धी मिळाली. भुवनचे यूट्यूबवर 25 दशलक्षाहून अधिक सबस्‍क्रायबर आहेत. भुवन त्याच्या वेगळ्या आणि मजेदार कंटेंट व्यतिरिक्त त्याच्या कॉमेडीसाठी देखील ओळखला जातो.

भुवनचे बहुतेक व्हिडिओ अॅडल्ट कॉमेडी आणि ड्रामावर आधारित असतात. जे खूप मजेदार आणि मनोरंजक आहेत. आपल्या प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठी आणि त्यांना वेगवेगळे अनुभव देण्यासाठी तो स्वतः ४-५ पात्रे साकारतो.

Social Blade नुसार, भुवनचे YouTube पेज दरमहा $11,000 ते $175,000 च्या दरम्यान कमावते. जीक्यू इंडियाच्या अहवालानुसार भुवनचे वार्षिक उत्पन्न सुमारे 10 कोटी आहे. त्याचे चॅनल B+ श्रेणीमध्ये समाविष्ट आहे. भुवन बामच्या 'बीबी की वाइन्स'चे फक्त भारतातच नाही तर परदेशातही हजारो लोक वेडे आहेत.

याशिवाय भुवन बाम हे मिविचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. रिपोर्टनुसार, येथून त्यांना दरवर्षी सुमारे 4 कोटी रुपये मिळतात. यासोबतच तो Myntra चाही अॅम्बेसेडर आहे, येथून त्यांना वर्षाला ५ कोटी रुपये मिळतात. या व्यतिरिक्त भुवन इतर अनेक ब्रँड्सना मान्यता देते, ज्यात Arctic Fox, Beardo, Lenskart, Mivi, Tissot आणि Tasty Treats ट्रीट्स यांचा समावेश आहे.

YouTube व्हिडिओ बनवण्याव्यतिरिक्त, भुवन बाम म्युझिक व्हिडिओ आणि शॉर्ट फिल्म्समध्ये देखील दिसला आहे. भुवन बामच्या 'ताजा खबर' या नव्या वेब सिरीजमध्ये येत आहे. यूट्यूब व्यतिरिक्त भुवनचे इंस्टाग्रामवर 14 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protest: सोशल मीडियावरील बंदीवरून नेपाळ ढवळून निघाला; भारताने नागरिकांना सतर्कतेचा सल्ला दिला, सांगितलं...

महाराष्ट्राच्या Shivam Lohakare ने मोडला 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राचा विक्रम; पण, होणार नाही अधिकृत नोंद, कारण...

Pune News : विसर्जन मिरवणुकीत हायटेक पोलिसिंग; चेहरा ओळख तंत्रज्ञानाचा अचूक वापर; सराईत गुन्हेगारांवर चाप

Shivaji Maharaj: इतिहासातील गुपित! छत्रपती शिवाजी महाराजांनी बोटं छाटल्यानंतर शाहिस्तेखान कुठं पळाला? पुढं कधीच परतला नाही

Thane Crime: सोनसाखळी चोरणारी आंतरराज्य टोळी गजाआड, तीन सराईत गुंडांना अटक

SCROLL FOR NEXT