tadap poster 
मनोरंजन

सुनील शेट्टीच्या मुलाचं बॉलिवूड पदार्पण; अजय-अक्षयने लिहिली भावूक पोस्ट 

स्वाती वेमूल

अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून त्याच्या पहिल्या चित्रपटाचा पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 'तडप' असं या चित्रपटाचं नाव असून यामध्ये अहानसोबत अभिनेत्री तारा सुतारिया मुख्य भूमिका साकारणार आहे.  या चित्रपटाचं दिग्दर्शन मिलन लुथरिया करणार आहेत. हा एक रोमँटिक चित्रपट असून अक्षय कुमारने त्याचं पोस्टर लाँच केलं आहे. अहानच्या पदार्पणाबाबत अजय देवगण आणि अक्षय कुमारने आनंद व्यक्त केला असून सोशल मीडियावर त्यांनी भावूक पोस्ट लिहिली आहे. 

'अहान, तुझ्यासाठी हा फार मोठा दिवस आहे. तुझे वडील सुनील शेट्टी यांचा पहिला चित्रपट 'बलवान'चं पोस्ट मला अजूनही आठवतंय आणि आता मी तुझा पोस्टर लाँच करतोय. मला खूप आनंद आणि अभिमान आहे', अशी पोस्ट अक्षय कुमारने लिहिली. तर अजय देवगणने लिहिलं, 'हे खूप भावनिक आहे. अहान खूप लवकर मोठा झाला. त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी सुनील शेट्टी तुमचं अभिनंदन. मिलन लुथरिया आणि साजिद नाडियादवाला यांच्यासारख्या प्रतिभावान लोकांच्या हाताखाली तो काम करत असल्याचा आनंद आहे.'

'तडप' हा चित्रपट आरएक्स १०० या तेलुगू चित्रपटाचा रिमेक असल्याचं म्हटलं जात आहे. तेलुगू चित्रपटात कार्तिकेय गुम्माकोंडा आणि पायल राजपूत यांच्या मुख्य भूमिका आहेत. आता हिंदी रिमेकमध्ये अहान आणि ताराची केमिस्ट्री पाहणं औत्सुक्याचं असेल. हा चित्रपट येत्या २४ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT