saif ali khan, taimur, taimur football video SAKAL
मनोरंजन

Taimur is Back: सैफची पोरं आहेच खास, मग इब्राहिम असो वा तैमुर...तोच रुबाब, तोच माज... व्हिडिओ व्हायरल

सैफ अली खानची मुलं तैमूर आणि इब्राहीम यांचा फुटबॉल खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय.

Devendra Jadhav

Taimur Football Video Viral News: सैफ अली खान आणि त्याचं कुटुंब सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. सैफ अली खानचं कुटुंब एकदम थाटामाटात जगत असतं. या कुटुंबाचं स्वतःचं वेगळं जग आहे.

गर्भश्रीमंत असलेलं कुटुंब खेळात सुद्धा तितकंच पुढे आहे. सैफ अली खानचं कुटुंब स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी मध्ये कायमच पुढे असतं.

अशातच सैफ अली खानची मुलं तैमूर आणि इब्राहीम यांचा फुटबॉल खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय.

(taimur saif ali khan ibrahim viral video of playing football on ground)

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओत सुरुवातीला इब्राहिम फुटबॉल खेळताना दिसतोय. तर दुसरीकडे तैमूर एकदम रुबाबात ग्राऊंडवर चालताना दिसतोय.

तैमूर हिरव्या रंगाची जर्सी घालून मैदानावर खेळताना दिसत आहे. त्याने आपल्या मामू रणबीर कपूरकडून प्रेरणा घेतल्याचे दिसते.

सैफ अली खान देखील एक प्रचंड फुटबॉल प्रेमी आहे आणि तो अनेकदा इतर सेलिब्रिटींसोबत खेळताना दिसतो. सैफ अली खानही तैमूरसोबत मैदानावर दिसला.

करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर अली खान सर्वात लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. तो पापाराझींचा आवडता सेलीब्रिटी राहिला आहे.

त्याचे फोटो क्लिक करणे किंवा पटकन लक्ष वेधून घेणारे व्हिडिओ शूट करणे सर्वांना आवडते. तैमुरच्या फुटबॉल खेळण्याच्या व्हिडिओने इंटरनेटवर तुफान राडा केलाय.

एकुणच इब्राहीम आणि तैमुर ही दोन्ही भावंडं फुटबॉल वेडे असल्याचं समजतंय. सैफ सुद्धा मुलांमध्ये फुटबॉलचं प्रेम निर्माण करताना दिसतोय.

वर्क फ्रंटवर, सैफ अली खान शेवटचा पुष्कर आणि गायत्रीच्या क्राईम थ्रिलर विक्रम वेधामध्ये हृतिक रोशन, राधिका आपटे यांच्यासोबत दिसला होता.

आता सैफ ओम राऊत यांच्या आदिपुरुष सिनेमात रावणाची भूमिका साकारणार आहे. याशिवाय ज्युनियर एनटीआरच्या तात्पुरते शीर्षक असलेल्या NTR30 मध्ये देखील दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT