Taimur is spoiling because of kareena says saif ali khan  
मनोरंजन

सैफ म्हणतो, ''करीनामुळेच तैमुर बिघडला आहे''

वृत्तसंस्था

मुंबई : बॉलिवूडमध्ये जितकी चर्चा कलाकारांची आहे तेवढीच किंबहूना अधिक चर्चा त्यांच्या मुलांची म्हणजेच स्टार किड्सची आहे. त्यातच जर सर्वाधिक पसंती असलेला आणि वयाच्या तीसऱ्या वर्षीच फेमस असलेला स्टार किड म्हणजे तैमुर अली खान. करीना आणि सैफ अली खानचा मुलगा तैमुर इंटरनेट सेंसशन आहे. तैमुरची एक झलक टिपण्यासाठी पॅपराझीही धडपड करत असतात. तैमुरच्या फोटोंपासून ते अगदी त्याच्या कपड्यांपर्यंत सर्व काही सोशल मीडियावर ट्रेंड होत असतं. पण, डॅडी सैफ म्हणाला की, करीनामुळेच तैमुर बिघडला आहे. जाणून घ्या नक्की काय आहे कारण ! 

सैफचे एकापाठोपाठ एक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मागील वर्षी त्याचा 'लाल कप्तान' हा सिनेमा रिलिज झाला. त्यानंतर वर्षाच्या सुरुवातीलाच 'तान्हाजी' हा सिनेमा रिलिज झाला. तान्हाजीने बॉक्सऑफिस आणि प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला. आजच त्याचा 'जवानी जानेमन' हा सिनेमा रिलिज झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सैफ व्य़स्त होता. अनेक कार्यक्रमांमध्ये आणि मुलाखती तो देत होता. 

दरम्यान एका मुलाखतीदरम्यान तो तैमुर आणि करीनाविषयीही बोलला. त्यावेळी बोलताना सैफ म्हणाला, ''तैमुर घरात सर्वात लहान असल्याने सर्वांचा तो लाडका आहे. पण, त्याचे अती लाड होता आहेत आणि त्याच्यासोबत शिस्तीने वागणेही गरजेचे आहे, असं सैफ म्हणाला. तैमुर सैफचा तिसरा मुलगा आहे आणि करीनाचा पहिला !  त्यामुळे करीना त्याचे सर्व लाड पुरवते. पण, घरामध्ये तैमुर दमदाटी  करायला लागला आहे. शाळेत जायलाही तो नाही म्हणतो.''

पुढे सैफ म्हणाला, तैमुर खूप प्रेमळ आहे. पण, एखाद्या गोष्टीसाठी त्याला कोणी नाही म्हणाले तर, ती व्यक्ती तैमुरसाठी नावडती होते. त्य़ाला राग आला तर तो म्हणतो, मी मारेन, डोकं फोडेन''.

अशा प्रकारची तैमुरची तक्रार सैफने केली. करीनाच्या लाडामुऴे तो बिघडतो आहे त्यामुळे त्याच्यासोबत थोडं कठोरतेने वागणे गरजेचे आहे, असं तो म्हणाला. सैफचा नुकताच 'जवानी जानेमन' रिलिज झाला. यामध्ये तो तब्बू आणि अलाया फर्निचरवाला यांच्यासोबत झळकला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT