priyanka chopra restaurant 
मनोरंजन

प्रियांकाच्या नव्या रेस्टॉरंटची खास झलक; पाहा व्हिडीओ

सकाळ ऑनलाइन

हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच हॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण करणारी प्रसिध्द अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमाच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचा पती निक जोनाससोबतचे व्हिडीओ आणि फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच प्रियांकाच्या 'सोना' या न्यूयॉर्कमधील नव्या रेस्टॉरंटचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ रेस्टॉरंटच्या अधिकृत अकांउटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये डायनिंग एरिया, बार आणि खासगी जागेची झलक दाखवण्यात आली आहे. प्रशस्त आणि प्रसन्न अशा या प्रियांकाच्या 'सोना' रेस्टॉरंटने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. 

काही दिवसांपूर्वी प्रियांकाने न्युयॉर्कमध्ये नवे रेस्टॉरंट सुरू करणार आहे हे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून सांगितले होते.  रेस्टॉरंटचा फोटो शेअर करून प्रियांकाने फोटोला कॅप्शन दिले की,' सोना हे नवीन रेस्टॉरंट सुरू होणार आहे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे. न्यूयॉर्कमधील या नवीन रेस्टॉरंटमध्ये भारतीय पद्धतीचे जेवण मिळणार आहे. यामध्ये हरीनेयक या शेफने नाविन्यपूर्ण मेनू तयार केले आहेत. सोना या महिन्याच्या शेवटी ग्राहकांसाठी उघडत आहे आणि मी तेथे तुम्हाला भेटण्याची प्रतीक्षा  करत आहे. माझा मित्र मनीष गोयल आणि डेव्हिड रॉबिन यांच्या नेतृत्त्वाशिवाय हा प्रयत्न करता आला नसता. डिझाइनर मेलिसा बॉवर्स आणि उर्वरित टीमचे आभार'.

या पोस्टमधील दुसरे आणि तिसरे फोटो सप्टेंबर 2019मधे रेस्टॉरंटसाठी ठेवण्यात आलेल्या पूजेचा आहे असे प्रियांकाने सांगितले. प्रियांकाचे परदेशात बरेच चाहते आहेत. तिच्या रेस्टॉरंटमधील भारतीय पद्धतीचे खाद्यपदार्थ खाण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. प्रियांकाने शेअर केलेल्या रेस्टॉरंच्या फोटोला तिच्या चाहत्यांनी कमेंन्ट करून शुभेच्छा दिल्या होत्या.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आज सोनं-चांदी स्वस्त! चांदीचा भाव 2 लाखांच्या खाली; सर्वसामान्यांना दिलासा; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

Winter Arthritis Pain in Women: महिलांनो सावधान! हिवाळ्यातील सांधेदुखीमागे असू शकतात ‘ही’ गंभीर कारण

Latest Marathi News Live Update : पुणे महापालिका तारखा जाहीर होताच मनसे आणि ठाकरे गट लागले कामाला

UP Accident: यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; दाट धुक्यामुळे ५ बस आणि कार एकमेकांना भिडल्या, ४ ठार, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

IPL 2026 Auction live : कहानी मे ट्विस्ट... BCCI ने ६ परदेशी खेळाडूंसह १९ जणांना घुसवले, गौतम गंभीरने 'नाकारले'ला तोही आला...

SCROLL FOR NEXT