Tamannaah Bhatiya Video Viral Fans Shocking Jumped esakal
मनोरंजन

Tamannaah Bhatia Crazy Fan : बॉडीगार्डनं हटकला पण भाऊ नाही घाबरला! चाहत्याची फोटोची 'तमन्ना' पूर्ण

साऊथची सुपरस्टार म्हणून तमन्नानं तिचा वेगळा फॅनबेस तयार केला आहे.

युगंधर ताजणे

Tamannaah Bhatiya Video Viral Fans Shocking Jumped : बॉलीवूडमध्ये आता तमन्ना तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून ती वेगळ्या कारणासाठी चर्चेतही आली आहे. लस्ट स्टोरीज २ मध्ये तिनं जो बोल्ड परफॉर्मन्स दिला त्यामुळे ती नेटकऱ्यांच्या रडारवरही आली होती. मात्र यामुळे तमन्नाच्या लोकप्रियतेतही कमालीची वाढ झाल्याचे दिसून आले.

साऊथची सुपरस्टार म्हणून तमन्नानं तिचा वेगळा फॅनबेस तयार केला आहे. आता तर तमन्नाची जोरदार चर्चाही होऊ लागली आहे. विजय वर्मासोबत दिलेल्या त्या बोल्ड सीननं ती हिट झाली. तमन्नाचा तो परफॉर्मन्स नेटकऱ्यांच्या दृष्टीनं टीकेचा विषय ठरला. आपण कधीही इंटिमेट सीन करणार नाही असे म्हणणाऱ्या तमन्नानं तिचाच शब्द मोडला. त्यामुळेच की काय चाहत्यांमध्ये चर्चेला सुरुवात झाली.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

सोशल मीडियावर तमन्नाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तिला भेटण्यासाठी एकानं जीवाचं रान केलं आहे. तमन्नाच्या भोवती असणारं सुरक्षा कडं ओलांडून तो तिच्याजवळ गेला होता. त्यावेळी मग तमन्नानेच बॉडीगार्डला समजावून त्या चाहत्याला एक फोटो घेऊ दिला. व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

एका मुलाखतीमध्ये तमन्नानं तिच्याविषयी गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा सुरु आहे त्यावर भाष्य केले आहे. मी जर ती भूमिका केली नसती तर माझ्या वाट्याला एखाद्या मावशीची किंवा ताईची भूमिका आली असती. दुसरं म्हणजे मी नव्हे तर आणखी कुणीतरी ती भूमिका केली असतीच की, असे म्हणून तमन्नानं तिची प्रतिक्रिया दिली आहे.

इंस्टावर तमन्नाला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आता तमन्ना महानायक रजनीकांतसोबत जेलरमध्ये दिसणार आहे. १० ऑगस्ट रोजी तो चित्रपट प्रदर्शित होणार आहे. रजनीकांतच्या जेलर या चित्रपटाला अॅडव्हान्स बुकिंगमध्ये जोरदार प्रतिसाद मिळाले आहे. सनी देओलचा गदर २ आणि अक्षय कुमारचा ओएमजी २ यामध्ये फाईट असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Politics : संजय पाटील यड्रावकर आणि राजू शेट्टींचे पीए स्वस्तिक पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी, "तुमचा काय संबंध"; नगपरिषदेतच हाय व्होल्टेज ड्रामा

Nagpur Land Survey : नवीन नागपूरसाठी जमिनीच्या संयुक्त मोजणीला सुरुवात; शेतकऱ्यांचे सहकार्य; विविध यंत्रणांचा सहभाग!

Latest Marathi Breaking News Live Update : नागपूरमध्ये काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून 221 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

Indian Railways Recruitment 2025: भारतीय रेल्वेत ज्युनियर इंजिनिअरच्या पदांसाठी भरती सुरू; येथे वाचा संपूर्ण माहिती

BJP vs Shivsena: २०२९ तयारी? भाजपमधील इनकमींगची दूसरी बाजू काय? शिंदे गटाच्या नेत्यांविरुद्ध ‘स्ट्राँग प्लॅन-B’ तयार?

SCROLL FOR NEXT