tamilnadu election 2021 south actor vijay cycles to polling booth to cast his vote  
मनोरंजन

निवडणूक पाच राज्यांची, हवा एकट्या विजयची; मतदानासाठी आला सायकलवर 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - टॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेता थलापती विजयच्या नावाची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. सध्या तामिळनाडूमध्ये इलेक्शन फिव्हर आहे. विधानसभेच्या मतदानासाठी विजयनं सायकल सवारी केली. मतदानासाठी तो चक्क सायकलवरुन गेला. त्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर काल दिवसभर सुरु होती. आता पुन्हा तो चर्चेत आला आहे त्या सायकलवरुन. विजयनं मतदान केंद्रापर्यत जी सायकल वापरली होती त्या सायकलच्या पोस्टही आता सोशल मीडियावर व्हायरल व्हायला सुरुवात झाली आहे. साऊथमधील कलाकार आणि त्यांचे चाहते यांच्यातील जगावेगळं नातं याची सर्वांनाच कल्पना आहे. यापूर्वीही अनेक कलाकारांनी वेगवेगळ्या प्रकारे स्टंटबाजी करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

कालचा दिवस मतदानाचा होता. येत्या काळात तामिळनाडूमध्ये काय होणार याचा उलगडा येत्या काही दिवसांत कळणार आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून निवडणूकीचा धुरळा मोठ्या प्रमाणावर उडत असताना त्याच्याविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. तामिळनाडूनमध्ये विधानसभेच्या जागांसाठी जी निवडणूक सुरु आहे त्यासाठी सेलिब्रेटींनीही हजेरी लावल्याचे दिसून आले आहे. प्रत्यक्षात मतदानासाठीही मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. त्यात चर्चा झाली ती प्रसिध्द अभिनेता विजय याच्या सायकलच्या प्रवासाची. त्यानं विधानसभा निवडणूकीसाठी मतदान केंद्रावर जाण्यासाठी सायकलचा वापर केला. मात्र तो सायकल घेऊन आल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. याप्रसंगी त्याला फॉलो करणा-यांची संख्याही मोठी होती. ही गर्दी हटविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीहल्ला करावा लागला.

काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या आणि केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवीत असलेल्या अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी सोशल मिडीयावरील चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. विजय यांनी इंधनदरवाढीबद्दल कोणताही संदेश दिलेला नाही. द्रमुकने दुसऱ्या कुणाच्या तरी सायकलवर स्वार होऊन आपला मुद्दा रेटणे थांबवावे असा टोला त्यांनी मारला.

विजयचा अनेकांनी दुचाकीवरून पाठलाग केला. काही करुन त्याच्याबरोबर फोटो मिळावा असा अनेकांचा प्रयत्न होता.  विजय यांनी वेगाने सायकल चालविण्याचा प्रयत्न केला, पण ते चाहत्यांपासून स्वतःची सुटका करून घेऊ शकले नाहीत. विजय यांचा इंधनदरवाढीबाबत काही संदेश देण्याचा उद्देश होता का अशी चर्चा द्रमुक पक्षाच्या नेत्यांनी केली, मात्र मतदान केंद्र घराच्या बाजूलाच, मात्र अरुंद गल्लीत असल्यामुळे आणि मोटारीतून गेल्यास वाहतूक कोंडी होण्याची शक्यता जास्त असल्यानेच त्यांनी सायकल वापरली असे त्यांच्या सहाय्यकानं सांगितलं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT