Veteran Bollywood Actress Tanuja Hospitalised: ज्येष्ठ अभिनेत्री आणि काजोलची आई तनुजा यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी संध्याकाळी शारीरिक समस्यांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या चर्चा होत्या.
तनुजा यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली ICU मध्ये उपचार सुरु आहेत.त्याच वेळी, तनुजा यांच्या आरोग्याशी संबंधित एक मोठे अपडेट समोर आली आहे. जी ऐकल्यानंतर चाहत्यांना काहीसा आनंद होणार आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, तनुजा यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे आणि आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. तनुजा यांची तब्येत पूर्वीपेक्षा चांगली आहे आणि त्यांना 1-2 दिवसांच्या आत रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात येणार आहे.
वयाशी संबंधित काही समस्यांमुळे तनुजांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा आहे.
तनुजा आजारपणातून ठणठणीत बऱ्या होण्यासाठी चाहते प्रार्थना करत होते. तनुजा यांच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच दिलासादायक बातमी आहे.
तनुजा यांच्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांचा जन्म 23 सप्टेंबर 1943 रोजी त्यांचा झाला. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी तनुजा यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांचा पहिला चित्रपट 'छबिली' हा होता.
यानंतर 1962 मध्ये त्या 'मेमदीदी' चित्रपटात दिसली. 'हाथी मेरे साथी', 'तुनपुर का हीरो', 'दो चोर' आणि 'मेरे जीवन साथी' यांसारख्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.
संजीव कुमारपासून राजेश खन्ना आणि धर्मेंद्रसारख्या अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत त्यांनी रुपेरी पडदा गाजवला. त्यांनी 'पितृऋण' या मराठी सिनेमात देखील अभिनय केलाय. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त तनुजाने बंगाली चित्रपटांमध्येही आपले नाव मिळवले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.