Tanushree Dutta Bollywood Actress controversy Statement esakal
मनोरंजन

Tanushree Dutta : तनुश्रीनं काढली नाना पाटेकरांची लायकी, 'ते तर तेव्हाही अन् आताही...' केली जहरी टीका!

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या द व्हॅक्सिन वॉर नावाच्या चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत.

युगंधर ताजणे

Tanushree Dutta Bollywood Actress controversy Statement : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर हे त्यांच्या द व्हॅक्सिन वॉर नावाच्या चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत. त्याच्या प्रमोशनसाठी नाना मुलाखती देत आहेत. त्यात ते वेगवेगळे खुलासे करत आहेत. काही धक्कादायक गोष्टीही सांगत आहेत. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

आतापर्यत नानांनी सध्याचे बॉलीवूड, बॉलीवूडमधील सेलिब्रेटी आणि त्यांचे स्टारडम यावर भाष्य केले आहेत. तसेच सनी आणि शाहरुखच्या जवानवर देखील त्यांनी आपल्या खास शैलीत मत व्यक्त केले आहे. याचवेळी सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबतही नाना बोलले आहेत. कुणी का होईना बोलण्याची तयारी दाखवली पाहिजे. जे चुकीचे आहे ते आपण बोलणार, कुणाचीही भीती न बाळगता. अशा शब्दांत ते व्यक्त झाले आहेत.

Also Read - Libya Flood : मृतदेहांचा रस्त्यावर खच,मदतीची केविलवाणी प्रतीक्षा, युद्धाच्या आगीतून बाहेर

यासगळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री तनुश्री दत्ता हिनं पुन्हा एकदा नानांवर खालच्या शब्दांत टीका केली आहे. तिनं यावेळी तर नानांची पात्रता आणि कार्यक्षमता यावर बोट ठेवत आपली भूमिका मांडली आहे. तनुश्री ही राखीचा पती आदिल दुरानीसोबत एका पत्रकार परिषदेमध्ये होती. त्यावेळी तिनं जे वक्तव्य केलं त्यावरुन वेगळ्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

तनुश्रीनं नाना आणि त्यांचे सध्याचे प्रमोशन यावर जहरी टीका केली. याचा संबंध तिनं आपल्या नावाचा वापर करुन त्या चित्रपटासाठी प्रसिद्धी मिळवण्याचा आहे. असे तनुश्रीचे म्हणणे आहे. तनुश्री त्या व्हिडिओमध्ये म्हणते की, नाना पाटेकर यांची २००८ मध्ये देखील तेवढी लायकी नव्हती की चित्रपट प्रमोशन करण्याची आणि आताही नाही. तुम्हाला माहिती नाही ही लोकं आता फारशी महत्वाची राहिलेली नाहीत. त्यांच्याविषयी आणखी काय बोलायचं. माझ्यामुळे यांच्या चित्रपटांना प्रसिद्धी मिळते. त्यामुळे ते माझे नाव घेत त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन केले जाते.

मला कुणाचे प्रमोशन करायचे नाही. पण ती लोकं मुद्दाम मीडियाला मला प्रश्न विचारण्यास सांगतात. त्यामुळे नको त्या विषयांना प्रसिद्धी दिली जाते. जे होते आहे ते मला सांगायचे आहे. काही वर्षांपूर्वी तनुश्रीनं नाना पाटेकर यांच्यावर मी टू चे आरोप केले होते. हे प्रकरण त्यावेळी खूपच चर्चेत आले होते. नानांनी देखील त्यावर स्वतंत्रपणे पत्रकार परिषद घेत हे आरोप फेटाळून लावले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : मुंबईकरांचे म्हाडाच्या लॉटरीतील घराचे स्वप्न लांबणीवर!

Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण

US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

Neeraj Chopra कडून घोर निराशा! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक राखण्यात अपयशी, टॉप-६ मध्येही स्थान नाही

SCROLL FOR NEXT