tappu aslo left the Taarak Mehta ka Ooltah Chashmah show sakal
मनोरंजन

काय.. टप्पूही सोडणार 'तारक मेहता..' मालिका? मोठा धक्का..

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेत गेले काही दिवस टप्पू एकदाही दिसलेला नाही.

नीलेश अडसूळ

Taarak Mehta ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उलटा चश्मा' हा सध्या टेलीव्हिजन विश्वातील हॉट टॉपिक आहे. (Tarak Mehta ka Ooltah Chashmah) ही मालिका प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध असून गेली अनेक वर्ष या मालिकेतील कलाकारही घराघरातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यात यशस्वी ठरले आहे. पण गेल्या काही दिवसांत या मालिकेसंदर्भात चाहत्यांना नाराज करणाऱ्या अनेक गोष्टी कानावर पडत आहेत. कारण मालिकेच बरेच कलाकार मालिकेला रामराम करत आहेत. काही दिवसांपूर्वी तारक मेहता ही महत्त्वाची भूमिका करणारे शैलेश लोढा मालिकेतून एक्झिट घेत आहेत ही बातमी सर्वत्र होती. त्यानंतर चाहत्यांमध्ये हॉट बबिता म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री मुनमुन दत्ता(Munmun Dutta) या मालिकेला रामराम ठोकत असल्याची बातमी कानावर आली आहे. अशा चर्चा सुरु असतानाच आता मालिकेतून टप्पू देखील निरोप घेणार असल्याची चर्चा आहे.

या मालिकेतील टप्पू हा देखील एक महत्वाचा भाग आहे. टप्पू आणि त्याची टप्पूसेना यांनी बराच काळ आपले मनोरंजन केले आहे. दरम्यान एकदा टप्पूची भूमिका साकरणारा कलाकार बदलला पण मालिकेची लोकप्रियता तशीच राहिली. पण आता मालिकेला एक जबर धक्का बसल्याची चर्चा आहे. या मालिकेत टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकट गेल्या काही एपिसोडमध्ये दिसत नाही. तो नेमका कुठे गेला आहे याबाबत देखील स्पष्टता मिळालेली नाही. यामुळे तोही लवकरच 'तारक मेहता..' या मालिकेचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. (tappu aslo left the Taarak Mehta ka Ooltah Chashmah show)

तसेच लवकरच मालिकेत दयाबेन परत येणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. पण आपल्या सगळ्यांची लाडकी दिशा वकानी दयाबेनच्या भूमिकेत दिसणार नसून दुसरी अभिनेत्री आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता दयाबेन सोबत टप्पूचे पात्रही बदलणार का याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी : भारतीय संघात राहायचा असेल तर... Rohit Sharma, विराट कोहली यांच्यासमोर अजित आगरकरने ठेवली अट

OBC leaders ultimatum : ‘’२ सप्टेंबरचा जीआर रद्द करा, श्वेतपत्रिका काढा’’ ; ओबीसी नेत्यांची सरकारला सहा दिवसांची मुदत!

IND vs AUS Full Schedule: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक ! वाचा कधी, कुठे, केव्हा खेळणार; वेळ व Live Telecast

ग्लोबल स्टार राम चरण याच्या हस्ते आर्चरी प्रीमियर लीगचा दणदणीत शुभारंभ

Hill Station Travel Tips: पहिल्यांदाच हिल स्टेशनला जाताय? मग ट्रॅव्हल बॅगमध्ये नक्की पॅक करा 'या' महत्वाच्या वस्तू

SCROLL FOR NEXT