Tara Sutaria  Sakal
मनोरंजन

Tara Sutaria: इकडं ब्रेकअप तिकडं डिनर! ब्रेकअप होताच तारा सुतारिया दुसऱ्यासोबत

फिल्ममेकर करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर 2' चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवणारी तारा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते.

सकाळ डिजिटल टीम

बी-टाऊनच्या सुंदर अभिनेत्रीबद्दल बोलायचे झाले तर त्यात तारा सुतारियाचेही नाव आहे. फिल्ममेकर करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर 2' चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवणारी तारा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. अलीकडेच तारा सुतारिया आणि तिचा लॉन्ग टाइम बॉयफ्रेंड आदर जैन यांचे ब्रेकअप झाले आहे. दरम्यान, तारा सुतारियाचे नवीनतम फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, ज्यामध्ये ती रोमँटिक कॅंडल लाईट डिनर डेटवर गेली आहे.

एक काळ असा होता जेव्हा तारा सुतारिया आणि आदर जैन हे बी-टाऊनचे सर्वात प्रसिद्ध जोडपे मानले जात होते. अनेक प्रसंगी, तारा आणि आदर यांना सोबत स्पॉट केले आहे. दरम्यान, तारा सुतारिया आणि आदर जैन एकमेकांशी लग्न करणार असल्याची बातमीही आली होती. पण या जोडप्याच्या नुकत्याच झालेल्या ब्रेकअपने या सर्व बातम्यांना ब्रेक लावला. आता तारा सुतारिया आणि आदर जैन यांचे मार्ग एकमेकांपासून वेगळे आहेत.

अलीकडेच तारा सुतारियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर नवीनतम फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तारा कँडल लाईट डिनर डेटवर गेली असे दिसत आहे. या फोटोंमध्ये तारा खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोंना कॅप्शन देताना ताराने नॅट किंग कोलच्या 'द व्हेरी थॉट ऑफ यू' या प्रसिद्ध गाण्याची ओळ लिहिली आहे.

तारा सुतारियाचे हे फोटो पाहिल्यानंतर आदर जैन यांच्यानंतर तारा आता कोणासोबत डिनर डेटवर गेली असल्याची चर्चा रंगली आहे. तारा सुतारियाने इन्स्टा पोस्टवर याचा खुलासा केला नसला तरी, इन्स्टा स्टोरीमध्ये ताराने सांगितले आहे की ती तिची मैत्रिण श्रद्धा इंदर मेहताच्या या खास डिनर डेटवर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT