tarak mehta ka ooltah chashma fame actor dilip joshi son wedding who is daughter in law  SAKAL
मनोरंजन

Dilip Joshi Son Wedding: जेठालालच्या रिअल लाईफ टप्पूचं झालं लग्न! कोण आहे दिलीप जोशींची सून? जाणून घ्या

दिलीप जोशींच्या लेकाचं थाटामाटात लग्न पार पडलंय

Devendra Jadhav

Dilip Joshi Son Wedding: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम दिलीप जोशी यांचं प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. दिलीप जोशींनी जेठालालच्या भूमिकेतून गेली दहा - बारा वर्ष लोकांना खळखळून हसवलं. जेठालालचे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण चाहते आहेत.

मालिकेत जेठालालचा मुलगा टप्पू दिसतो. दिलीप जोशींच्या रिअल लाईफ टप्पूचं लग्न झालंय. कोण आहे दिलीप यांची होणारी सून? जाणून घ्या.

जेठालालच्या रिअल लाईफ टप्पूचं झालं लग्न

दिलीप जोशींचा मुलगा ऋत्विकचे लग्न थाटामाटात पार पडले. ऋत्विकने उन्नती गाला सोबत लग्न केलं. दिलीप - उन्नती या दोघांच्या लग्नाचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दिलीप जोशी यांच्या मुलाच्या लग्नाला तारक मेहता का उल्टा चष्माची संपूर्ण स्टारकास्टही उपस्थित होती. यावेळी दयाबेन दिशा वाकानी सुद्धा सहभागी होती. त्याचवेळी, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये दिलीप यांची सून तिच्या हातावर मेंदी लावताना दिसत आहे.

दिलीप जोशी यांची सून कोण आहे?

व्हायरल झालेले व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वजण दिलीप जोशी यांच्या सुनेचे कौतुक करत आहेत. दिलीप जोशी यांची सून आणि मुलगा काय करतात ते पाहूया.

दिलीप यांची सून उन्नती गालाबद्दल बोलायचे तर ती देखील एक अभिनेत्री आहे. ती गुजराती कुटुंबातील आहे. उन्नती ही गुजराती थिएटर आर्टिस्ट आहे. तिला गुजराती नाटकात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे.

दिलीप जोशी यांचा मुलगा काय करतो?

याचवेळी दिलीप जोशी यांच्या मुलाबद्दल सांगायचं तर त्यांचा मुलगा ऋत्विक जोशी हा देखील अभिनेता आहे. 'धमाका' या चित्रपटात तो दिसला आहे. तो एक पटकथा लेखकही आहे. त्याने अनेक प्रकल्पांवरही काम केले आहे. दिलीप जोशींना एक मुलगीही असून तिचं नाव नियती. नियतीने २०२१ ला लग्न केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI : संजू सॅमसनची अविस्मरणीय खेळी... वंदे मातरम्... सूर्यकुमार यादवचा कुर्निसात... अंगावर शहारा आणणारा Video

T20 WC, IND vs WI : संजू सॅमसनची ९७ धावांची मॅच विनिंग खेळी! भारत ऐतिहासिक विजयासह उपांत्य फेरीत; आता इंग्लंडला भिडणार

Sanju Samson Reaction : देवाची कृपा! संजू सॅमसन भावनिक झाला; सेलिब्रेशन, देवाचे आभार अन् म्हणाला, विराट, रोहित यांनी...

BMC Property Tax: मुंबईकरांना दिलासा!मालमत्ता करात मोठा बदल; ७०० स्क्वेअर फूट घरांना फायदा, बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय

Paithan Crime: अपहृत विद्यार्थिनीची सुटका, शिक्षकास बेड्या; पैठण पोलिसांची मुंबईत कारवाई, लोकेशन बदलून देत होता हुलकावणी!

SCROLL FOR NEXT