Joe Lara  
मनोरंजन

'टार्झन' फेम अभिनेता जो लारा यांचा विमान अपघातात मृत्यू

जो लारा यांच्यासह सात जणांचा विमान अपघातात मृत्यू झाला.

स्वाती वेमूल

'टार्झन : द एपिक अँडव्हेंचर्स' Tarzan: The Epic Adventures या चित्रपटातील अभिनेता जो लारा Joe Lara यांच्यासह सात जणांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या विमानात जो यांच्यासोबत त्यांची पत्नीसुद्धा होती. अमेरिकेच्या नॅशविले शहराजवळील तलावामध्ये त्यांचं विमान कोसळलं आणि या भीषण अपघातात जो लारा यांचा मृत्यू झाला. शनिवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी ११ वाजता विमानाने फ्लॉरिडाच्या टेमिनी विमानतळावरून उड्डाण केलं. उड्डाणाच्या काही मिनिटांनंतर लगेचच हा अपघात घडला. (Tarzan Actor Joe Lara Among 7 Presumed Dead In US Plane Crash)

अपघातग्रस्त विमान नॅशविलेजवळ असणाऱ्या पर्सी प्रिस्ट तलावात कोसळलं. शनिवारी रात्रीपर्यंत बचावकार्य सुरू होतं. त्यानंतर शनिवारी रात्री उशिरा पीडितांची ओळख पटवण्यात आली.

१९९६ आणि २००० दरम्यान शूट झालेल्या मालिकेतील २२ एपिसोड्समध्ये जो लाराने मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर 'टार्झन इन मॅनहॅटन' या चित्रपटातही ते मुख्य भूमिकेत होते. 'स्टील फ्रंटीअर', 'सनसेट हीट', 'गनस्मोक : द लास्ट अपॅचे', 'अमेरिकन सायबर्ग : स्टील वॉरिअर', 'द मॅग्निफिशियंट सेव्हन', 'बेवॉच' आणि 'ट्रॉपिकल हीट' यांसारख्या चित्रपटांतही त्यांनी काम केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT