Taylor Swift Deepfake eSakal
मनोरंजन

Taylor Swift Deepfake : पॉप सिंगर टेलर स्विफ्टचा डीपफेक फोटो व्हायरल; अमेरिकेतही होतेय कायदा बनवण्याची मागणी

भारतातील कित्येक सेलिब्रिटींच्या डीपफेकचं प्रकरण ताजं असतानाच आता जगप्रसिद्ध पॉप सिंगर टेलर स्विफ्टचाही डीपफेक फोटो समोर आला आहे.

Sudesh

Taylor Swift Deepfake Picture : आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, म्हणजेच एआयचा वापर करून 'डीपफेक' व्हिडिओ किंवा फोटो तयार करण्याचं प्रमाण सध्या जगभरात वाढत आहे. भारतातील कित्येक सेलिब्रिटींच्या डीपफेकचं प्रकरण ताजं असतानाच आता जगप्रसिद्ध पॉप सिंगर टेलर स्विफ्टचाही डीपफेक फोटो समोर आला आहे. हा फोटो व्हायरल होताच, आता अमेरिकेत देखील डीपफेक विरोधात कायदा करण्याची मागणी होत आहे.

अमेरिकी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, टेलर स्विफ्टचा डीपफेक फोटो एक्स आणि टेलिग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. एका रिपोर्टनुसार तब्बल 47 मिलियन लोकांनी एक्सवर हा फोटो पाहिला होता. आता हा फोटो सोशल मीडियावरुन हटवण्यात आला आहे. (Taylor Swift Deepfake)

'एक्स'ची प्रतिक्रिया

एक्स, म्हणजेच ट्विटरने म्हटलं आहे, की या प्रकरणावर ते पूर्णपणे लक्ष ठेऊन आहेत. अशा प्रकारचा कंटेंट हटवण्याचं काम मोठ्या स्तरावर सुरू आहे. जे लोक हे फोटो पोस्ट किंवा शेअर करत आहेत त्यांच्या अकाउंटवर कारवाई केली जात आहे, असंही एक्सने स्पष्ट केलं. (X reaction on Taylor Swift Deepfake)

टेलर स्विफ्टचा निर्णय

दरम्यान, या सर्व प्रकारामुळे टेलर स्विफ्टने कायदेशीर कारवाईचे संकेत दिले आहेत. ज्या वेबसाईटच्या मदतीने हा एआय फोटो तयार करण्यात आला, त्याविरोधात ती खटला दाखल करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. या फोटोंमुळे ती अगदीच व्यथित झाल्याची माहिती तिच्या एका निकटवर्तीयाने दिली. (Taylor Swift Viral Photo)

नव्या कायद्याची मागणी

हा प्रकार अतिशय गंभीर आणि भयानक असल्याचं मत अमेरिकेतील एका खासदाराने व्यक्त केलं. अमेरिकेतील कित्येक नेत्यांनी डीपफेक विरोधात नवीन कायदा तयार करण्यासाठी बैठक बोलवण्याची मागणी केली आहे. अमेरिकेत डीपफेक फोटो तयार करण्याबाबत सध्या कोणताही कायदा अस्तित्वात नाही. बीबीसीने याबाबत माहिती दिली आहे. (US Law for Deepfake)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RCB: सॉल्टपाठोपाठ रजत पाटिदारचंही वानखेडेवर घोंगावलं वादळ, मुंबई इंडियन्सविरुद्ध विक्रमी अर्धशतक; विराट कोहलीचाही रेकॉर्ड

Donald Trump: इस्लामाबाद चर्चा फसली! संतापलेले डोनाल्ड ट्रम्प आता काय करणार? इराणला कडक अल्टीमेटम देत पुढचा प्लॅन सांगितला

MI vs RCB: LORD Shardul मुंबई इंडियन्सच्या मदतीला धावला! चौकार - षटकारांचा पाऊस पाडणाऱ्या फिल सॉल्टचा काढला काटा

Nagpur Student End Life : 'माफ कर, मम्मी, तुझा मुलगा..' , बीसीएत शिकणाऱ्या मुलाने आईला चिट्टी लिहली अन्..., मित्राला फोन करून नको होत ते केलं

Aditi Tatkare Baramati : बारामतीत अदिती तटकरेंचे भावनिक आवाहन; “दादांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न सुनेत्रा ताई पूर्ण करणार"

SCROLL FOR NEXT