TDM movie director bhaurao karhade talks on marathi audience in sakal podcast interview sakal
मनोरंजन

'TDM'च्या गोंधळानंतर 'मराठी प्रेक्षकां'बाबत दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचं मोठं विधान..

'सकाळ डिजिटल'वर दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांची खास मुलाखत..

नीलेश अडसूळ

Director Bhaurao Karhade on marathi audience : ख्वाडा, बबन यासारऱ्या अस्सल गावरान ढंगातील, रंगातील चित्रपट प्रेक्षकांसमोर आणत आपली वेगळी ओळख निर्माण कऱणारा दिग्दर्शक म्हणून भाऊ कऱ्हाडेचे नाव घ्यावे लागेल. गेल्या काही दिवसांपासून भाऊ आणि त्याचा टीडीएम नावाचा चित्रपट चर्चेत आहे.

टीडीएमचा ट्रेलर व्हायरल झाला आणि प्रेक्षकांना त्या चित्रपटाचे वेध लागले होते. २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या टीडीएमला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र त्यानंतर या चित्रपटाला थिएटरमध्ये पुरेशा प्रमाणात स्क्रिन न मिळाल्यानं नाईलाजानं चित्रपटाचं प्रदर्शन थांबवावं लागलं.

यामुळे प्रेक्षकांची मोठी निराशा झालीच शिवाय याबाबत बोलताना दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे भावुक झाले. त्यानंतर हे प्रकरण चांगलंच पेटलं आहे. पुण्यात या चित्रपटाच्या समर्थनार्थ चक्क भव्य मोर्चा काढला होता.

हे प्रकरण अद्याप थंड झालेलं नाही, कारण भाऊरावांचा 'TDM' पुन्हा प्रदर्शित होणे बाकी आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांची 'सकाळ unplugged' या पॉडकास्ट मध्ये विशेष मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी 'मराठी प्रेक्षकांबाबत' के विशेष विधान केले.

(TDM movie director bhaurao karhade talks on marathi audience in sakal podcast interview)

या संपूर्ण प्रकरणानंतर प्रेक्षकांविषयी तुमचं काय मत आहे.. त्यांच्याकडून प्रतिसाद कसा मिळाला यावर भाऊरावांना विचारले गेले. त्यावेळी ते अत्यंत स्पष्ट शब्दात म्हणाले, ''जे झालं ते चुकीचचं होतं आणि सध्या जे काही होतं आहे तेही चुकीचं आहे. प्रेक्षक याबाबत सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहेत. सगळ्यांना त्या गोष्टी जाणवल्या आहेत. काही जाणकार मंडळी देखील त्यावर बोलत आहेत. तसे होण्याचे काहीच कारण नव्हते. यावेळी फक्त दोनच चित्रपटच होते. त्यामुळे जे झाले ते चुकीचेच होते.' असे मला वाटते.

पुढे ते म्हणाले, ''आपला प्रेक्षक खूप संवेदनशील आहे. माझ्या चित्रपटाचा विषय जेव्हा पहिल्यांदा सोशल मीडियावरुन व्हायरल झाला तेव्हा त्याला गावागावातून चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपट बंद करण्याचा निर्णय घेतला तेव्हा लोक रस्त्यावर उतरले. मराठी चित्रपटासाठी लोकं रस्त्यावर उतरण्याची ही मराठी चित्रपट विश्वातील पहिलीच घटना असेल. हे मला आवर्जुन सांगावंस वाटतं. लोकांना ज्या गोष्टी आवडतात त्या ते डोक्यावर घेतात.''

यालाच जोडून भाऊराव पुढे म्हणाले, ''आपला प्रेक्षक खूप सजग आहे. ते त्यांना काही आवडलं नाही तर स्पष्टपणे सांगतात. माझ्याबाबत मला प्रेक्षकांचे खूप सहकार्य मिळाले. लोकांनी ट्रॅक्टर काढून ते मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मराठी चित्रपट तेव्हाच मोठा होईल जेव्हा...सगळे मिळून एकमेकांना सहकार्य करतील आणि आज तेच करण्याची गरज आहे.''

याशिवाय त्यांनी मनोरंजन विश्वातील राजकारण, त्याचा नव्या कलाकारांना बसणारा फटका यावरही बोलले आहेत. त्यांची सविस्तर मुलाखत ऐकण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर नक्की क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

ढिंग टांग : वाजत गाजत या...!

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

SCROLL FOR NEXT