teacher's day 2022 : utkarsh shinde shared memory of his teachers and old days  sakal
मनोरंजन

Teacher's day: शिक्षक दिनानिमित्त उत्कर्ष शिंदेने सांगितली आठवण; म्हणाला..

गायक, संगीतकार, अभिनेता अशा नाना भूमिका साकारणाऱ्या उत्कर्ष शिंदेच्या खास आठवणी..

नीलेश अडसूळ

utkarsh shinde : शिंदेशाहीतील एक महत्वाची व्यक्ती म्हणजे उत्कर्ष शिंदे. ज्येष्ठ गायक प्रल्हाद शिंदे यांचा नातू आणि आनंद शिंदे यांचा मुलगा उत्कर्ष शिंदे, शिंदेशाही गाण्याची ही परंपरा समर्थपणे पेलत आहे. बिग बॉस मराठीतून त्याची आणि आपली भेट झाली. त्याच्या दमदार खेळाने तो प्रेक्षकांच्या घरातच नाही तर मनात पोहोचला. उत्कर्ष डॉक्टरकी, गायन, लेखन, संगीत दिग्दर्शन अशा अनेक भूमिका पार पाडत आहे. उत्कर्ष एक उत्तम व्यक्ती असून सामाजिक आस्था बाळगणारा आहे. अनेकदा तो सामाजिक कार्यातही व्यस्त असतो. आज शिक्षक दिना निमित्त त्याने आपल्या आयुष्यात आलेल्या शिक्षकांविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. (teacher's day 2022 : utkarsh shinde shared memory of his teachers and old days)

उत्कर्ष म्हणतो, माझ्या आयुष्यात तीन वेगवेगळ्या टप्प्यात गुरूची साथ मिळली, ज्यामुळे मी इतका पुढे आलो आहे. माझ्या खालसा शाळेचे प्राचार्य अय्यर सर, ज्यांनी मला खूप मार्गदर्शन केले. ते म्हणायचे तुझ्यात घरात गायकी असल्याने ती गायकच व्हायला पाहिजे असे काही नाही. म्हणूनच त्यांनी मला शाळेच्या इतर कार्यक्रमात पुढे जाण्याची संधी दिली.

'माझ्या आयुष्यातील पहिले गुरु म्हणजे माझे आई वडील. आईच्या इच्छेखातर मी डॉक्टर झालो. आईचे म्हणते सगळेच गायक झाले पाहिजे असे नाही जनतेच्या हितासाठी पण काहीतरी केले पाहिजे. म्हणून मी डॉक्टर झालो. वैद्यकीय शिक्षण घेताना वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथील प्राचार्य - डॉ. डी. बी. शर्मा सर यांनी तर मला डॉक्टर म्हणून घडवलेच पण माझ्यातला कलाकार ओळखून त्यांनी महाविद्यालयच्या इतर कार्यक्रमात मला गाण्याची शिवाय नाटकात अभिनय करण्याचीही संधी दिली. पुढे उच्च शिक्षणासाठी मी लंडनला गेलो तेव्हा तिथल्या प्राचार्यानी डॉक्टरता खरी काय असते याबद्दल योग्य मागदर्शन केले.

पुढे तो म्हणतो, 'रक्तात संगीत असल्याने कुठेतरी मन हे सारखं संगीताकडे खेचत होतं. संगीतातले पहिले गुरू म्हणजे माझे आजोबा प्रल्हाद शिंदे आणि वडील आनंद शिंदे. तोच वारसा घेऊन संगीत क्षेत्रात आलो. 'बिग बॉस' ने तर मला नवीन ओळख दिली. महाराष्ट्राच्या घरात घरात पोहोचलो आहे, पण या मागे माझा भाऊ आदर्श शिंदे याने खुप साथ दिली. आईची इच्छा म्हणून डॉक्टर झालो पण आदर्शला समजले खरे मला नेमके काय पाहिजे ते. एक मोठा भाऊ आणि एक गुरू म्हणुन नेहमी सबोत असतोच. आम्ही दोघांनी मिळुन अनेक गाणी गायली आहेत. सध्या सोनी मराठीवर 'ज्ञानेश्वर माऊली' मालिकेत 'संत चोखामेळा' म्हणून मी भूमिका करत आहे. लवकरच मराठी चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून माझी भूमिका असेल.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pratap Sarnaik : महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी, टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Priyank Kharge statement : प्रियांक खर्गेंंचं हिंदू धर्माबाबत मोठं विधान! ; निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला पडणार महागात?

Puja Khedkar: पूजा खेडकरच्या आई मनोरमा यांच्याविरुद्ध गुन्हा; सोमवारी पुन्हा बंगल्याची झडती, नेमकं काय घडलं?

NMIA: लोटस-इंस्पायर्ड डिझाईन, फ्युचरिस्टिक टेक अन्...; नवी मुंबई विमानतळ जागतिक पातळीवर चमकणार, कसं आहे नवं Airport?

Latest Marathi News Updates : एससी आरक्षण बदलल्याचा खोटा प्रचारः राहुल डंबाळे

SCROLL FOR NEXT