actress vidya balan movie
actress vidya balan movie  Team esakal
मनोरंजन

शेरनीचा टीझर व्हायरल, फॉरेस्ट ऑफिसरच्या लूकमध्ये विद्या बालन

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री विद्या बालन (bollywood actress vidya balan) तिच्या आगामी शेरनी (Sherni) नावाच्या चित्रपटामध्ये एका वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर (Teaser) आज प्रदर्शित करण्यात आला आहे. त्याच्या टीझरला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. जवळपास एक वर्षांपासून विद्याचे चाहते तिच्या या चित्रपटाची वाट पाहत आहेत. कोरोनामुळे अनेक चित्रपटांना प्रदर्शनासाठी वाट पाहावी लागत आहे. याचा फटका निर्माते आणि दिग्दर्शकांना बसला आहे. (teaser of vidya balans sherni forest officer fans intrigued and excited)

सोशल मी़डियावर (social media) विद्याच्या शेरनीचा टीझर प्रदर्शित झाला आहे. टी सीरिज आणि अबंडनशीया एंटरटेंन्मेंटच्या सहयोगानं या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. न्युटन चित्रपटाचे दिग्दर्शक अमित मसूरकर (amit masurkar) यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. त्याविषयी निर्मात्यांनी यापूर्वी सांगितले होते. यापूर्वी विद्याचा शकुंतला देवी (shkuntala devi) नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यालाही चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

शेरनी या चित्रपटामध्ये विद्यानं एका फॉरेस्ट अधिका-याची भूमिका साकारली आहे. शेरनी ही एक काल्पनिक कथा आहे. मानव आणि प्राणी यांच्यातील संघर्ष या चित्रपटाच्या माध्यमातून मांडला गेला आहे. त्याचा ट्रेलर २ जूनला प्रदर्शित होणार आहे. त्याच्या टीझरनं आता प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

भुषण कुमार, कृष्ण कुमार, विक्रम मल्होत्रा आणि अमित मसूरकर यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटामध्ये शरद सक्सेना, मुकूल चढ्ढा, विजय राज, इला अरुण, बृजेंद्र कला, नीरज काबी यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट जूनमध्ये अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. अद्याप त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT