teen adkun sitaram movie trailer starring prajakta mali vaibhav tatwawadi alok rajwade sankarshan karhade  SAKAL
मनोरंजन

Teen Adkun Sitaram Trailer: तीन मित्र आणि एक रात्र, प्राजक्ता माळीच्या तीन अडकून सीताराम चा भन्नाट ट्रेलर

प्राजक्ता माळीच्या आगामी तीन अडकून सीताराम सिनेमाचा ट्रेलर पाहून खळखळून हसाल

Devendra Jadhav

गेल्या अनेक दिवसांपासुन मराठी मनोरंजन विश्वात अनेक नवनवीन सिनेमे येत आहेत. बाईपण भारी देवा सिनेमाने काहीच दिवसांपुर्वी बॉक्स ऑफीसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी केली. आता आणखी एक वेगळ्या विषयाचा हटके सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा म्हणजे तीन अडकून सीताराम.

तीन अडकून सीताराम सिनेमाचा भन्नाट ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. काय आहे हा ट्रेलर जाणुन घ्या

(Teen Adkun Sitaram Trailer)

तीन अडकून सीताराम सिनेमाचा ट्रेलर

तीन अडकून सीताराम सिनेमाचा ट्रेलर लॉंच इव्हेंट काल पार पडला. या ट्रेलरमध्ये बघायला मिळतं वैभव, आलोक आणि संकर्षण हे तीन मित्र लंडनमध्ये गेलेले असतात.

लंडनमध्ये बारमध्ये दारुच्या नशेत हे मित्र काहीतरी अशी गोष्ट करतात, की ज्यामुळे पोलिस त्यांना अटक करतात. आपण नशेत काय केलं याची त्यांना अजिबात जाणीव नसते.

प्राजक्ता माळी ही सिनेमात वैभवची गर्लफ्रेंड असते. ती या तिघांना सोडवण्यासाठी धडपड करते. आता या तीन मित्रांनी नक्की काय केलंय? ते जेलमधून सुटणार का? तीन अडकून सीताराम म्हणजे काय? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सिनेमा पाहून मिळती.

खळखळून हसवणारा तीन अडकून सीताराम सिनेमा

तीन अडकून सीताराम चित्रपटाबद्दल लेखक, दिग्दर्शक हृषिकेश जोशी म्हणतात, ‘’ नावावरून प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती, नेमका हा चित्रपट आहे तरी काय? तर टिझरवरून प्रेक्षकांना अंदाज आला असेलच.

यात काही रहस्य आहेत, गुंतागुंत आहे आणि हा गुंता अखेर सुटणार का? हे यात पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करणारा हा चित्रपट आहे. ‘तीन अडकून सीताराम’चा खरा अर्थ प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच कळेल.’’

तीन अडकून सीताराम सिनेमाची रिलीज डेट काय?

तीन अडकून सीताराम चित्रपटाविषयी प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती त्या ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटाचे जबरदस्त टिझर सोशल मीडियावर अखेर झळकले आहे. टिझर बघून या चित्रपटाविषयीची उत्कंठा आता आणखीनच शिगेला पोहोचली आहे.

टिझर अतिशय धमाल असून यात काहीतरी गुंतागुंत दिसत आहे. आता हा सुरू असलेला गोंधळच नेमका काय आहे, कशामुळे आहे, याचेच उत्तर आपल्याला २९ सष्टेंबरला चित्रपटगृहात मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Report 2025: भारतीयांच्या मासिक पगारात वाढ, केंद्र सरकारची आकडेवारी जाहीर, तुमचा ७ वर्षांत किती पगार वाढला?

Pune Murder News : पुण्यात पहाटे खुनाचा थरार! तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या; कुठं घडली घटना?

Latest Marathi News Live Update: अतिवृष्टीचा केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला फटका

Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाचा मुहूर्त ठरला! उद्घाटनानंतर ६० दिवसांत होणार पहिलं उड्डाण; कसं असेल नवं विमानतळ?

Nagpur Fraud: व्यापारी पगारिया यांची १८.३० कोटींनी फसवणूक; करारानंतरही विदेशी कंपनीकडून माल पाठविण्यास टाळाटाळ

SCROLL FOR NEXT