Tejas Box Office Collection Day 2: Esakal
मनोरंजन

Tejas Box Office Collection Day 2: बॉक्स ऑफिसवर 'तेजस'चा निघाला जीव! कंगनानं केलं चाहत्यांना मदतीचं आवाहन...

कंगना राणौतचा 'तेजस' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने कंगनाने तिच्या चाहत्यांना मदतीचे आवाहन केले आहे.

Vaishali Patil

Kangana Ranaut Video: बॉलिवूड क्वीन कंगना राणौतचा 'तेजस' चित्रपट 27 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. कंगनाला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. तिने चित्रपटाचे प्रमोशनही जोरदार केले. मात्र प्रेक्षकांचा या सिनेमाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. 'तेजस'ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर फार निराशजनक ओपनिंग केली आहे.

पहिल्या दिवशी चित्रपटाने1.25 करोडची कमाई केली होती, आता 'तेजस'च्या दुसऱ्या दिवसाच्या कलेक्शनवर नजर टाकली तर आकडेवारीनुसार, कंगनाच्या 'तेजस'ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 1.25 कोटींची कमाई केली आहे. तर आता तेजसचे एकूण कलेक्शन 2.5 कोटी झाले आहे.

एकीकडे चाहत्यांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे तर दुसरीकडे कंगनाने एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेयर करत प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.

या व्हिडिओत कंगना म्हणतेय की, 'कोविडनंतर आमची हिंदी फिल्म इंडस्ट्री पूर्णपणे सावरलेली नाही. मी मल्टिप्लेक्सच्या प्रेक्षकांना विनंती करते की जर तुम्ही उरी, नीरजा, मेरी कॉम सारख्या चित्रपटांचा आनंद घेतला असेल तर तुम्हाला तेजस देखील खूप आवडेल.'

आता कंगनाच्या चित्रपटाला विकेंडचा किती फायदा होतो हे तर रविवारच्या कलेक्शननंतर कळेलच. कंगनासोबत या चित्रपटात अंशुल चौहान, वरुण मित्रा, आशिष विद्यार्थी आणि विशाख नायर मुख्य भूमिकेत दिसत आहेत.

'तेजस'पूर्वी कंगना राणौतचे 'धाकड' आणि 'चंद्रमुखी 2' हे सिनेमेही रिलीज झाले होते, मात्र हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. त्यामुळे तिला तेजस कडून अपेक्षा होती मात्र ती अपेक्षा पुर्ण होताना दिसत नाही आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार व्हावे! राहुल गांधींचा मोर्चाआधी मोठा इशारा, 'एसआयआर' मधील खरे गुन्हेगार दुसरेच..

IND vs NZ : भारतीय संघाला धक्का, स्टार फलंदाजाने लंगडत मैदान सोडले; न्यूझीलंड दौऱ्यासाठी उद्या होणार होता रवाना, पण...

Ladki Bahin Yojana Payment Update : ...तर खात्यात जमा होणार एकत्र 3000 रुपये? लाडकी बहीण योजनेच्या नव्या अपडेटने वाढवली उत्सुकता, नवरात्रीत लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार?

SCROLL FOR NEXT