tejashree pradhan,ashutosh patki file image
मनोरंजन

आशुतोषसोबतच्या नात्यावर तेजश्री प्रधान म्हणाली; 'आम्ही दोघं..'

आशुतोष पत्कीने तेजश्रीच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली होती.

प्रियांका कुलकर्णी

मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान (tejashree pradhan) तिच्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेमध्ये तेजश्रीने शुभ्राची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकेत सोहम ऊर्फ बबड्याची आणि शुभ्राची जोडी प्रेक्षकांना आवडली. काही दिवसांपूर्वी बबड्या ही भूमिका साकारणारा अभिनेता आशुतोष पत्कीने (ashutosh patki) तेजश्रीच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली होती. त्या पोस्टनंतर आशुतोष आणि तेजश्री डेट करत आहेत अशी चर्चा सुरू झाली. त्यावर एका मुलाखतीमध्ये तेजश्रीने उत्तर दिले आहे. (tejashree pradhan on relationship rumours with aggabai sasubai fame ashutosh patki)

आशुतोषसोबतच्या नात्याबद्दल तेजश्री म्हणली, 'आशुतोष माझा खूपच जवळचा मित्र आहे आणि म्हणूनच त्याने तो फोटो माझ्या वाढदिवसानिमित्त पोस्ट केला. आमच्यात काही सुरु तर नाही ना अशी चर्चा मालिका सुरु असतानादेखील व्हायची. त्यामुळे माझ्यासाठी हे काही नवीन नाही. पण आमच्यात मैत्रीपलीकडे काहीच नाही.'

आशुतोष ने पोस्टमध्ये लिहिले होते, 'माझी प्रिय मैत्रीण, मला तुला हे सांगायचं आहे की तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेस आणि आपली मैत्री मी कायम जपेन. माझी नेहमीच साथ दिल्याबद्दल, मला प्रोत्साहित केल्याबद्दल आणि एक अभिनेता,एक माणूस म्हणून मला घडण्यास मदत केल्याबद्दल तुझे खूप आभार. या वाढदिवशी मी तुला दोन टिप्स देणार आहे. सर्वांत पहिलं म्हणजे, भूतकाळ विसर कारण ते तू बदलू शकत नाहीस आणि दुसरं म्हणजे प्रेझेंट (भेटवस्तू) विसर, कारण मी तुला देऊ शकलो नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा'. मालिकेच्या शूटिंगदरम्यान तेजश्री आणि आशुतोष यांच्यात खूप चांगली मैत्री झाली. दोघांच्या आवडीनिवडीसुद्धा सारख्याच असल्याने मैत्री करण्यासाठी त्यांना फार वेळ लागला नाही. मालिका सध्या बंद झाली असली तरी शुभ्रा आणि सोहमची जोडी प्रेक्षकांना अजूनही लक्षात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Rains : पश्चिम बंगालमध्ये पावसाचा कहर; दार्जिलिंगमधील भूस्खलनात आतापर्यत १८ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Latest Marathi News Live Update: श्री बालाजी महाराज मंदिरात विराजमान

INDW vs PAKW: पाकिस्तानी कर्णधाराने चालू सामन्यात स्प्रे मारला, नंतर सर्वच खेळाडूंना मैदानाबाहेर काढलं; नेमकं काय घडलं?

Metro-3: अखेर प्रतिक्षा संपली! मेट्रो-३ चा वरळी-कफ परेड टप्पा ९ ऑक्टोंबरपासून प्रवासी सेवेत, जाणून घ्या तिकीट दर

Kojagiri Horoscope Prediction : उद्या कोजागिरी पौर्णिमेला बनतोय गजकेसरी आणि ध्रुव योग; या पाच राशींवर होणार धनलक्ष्मीची कृपा

SCROLL FOR NEXT