Tejashree Pradhan Latest Post Instagram
मनोरंजन

'मला चुकीची वागणूक देणाऱ्यांना मी सोडत नाही' तेजश्रीची पोस्ट कोणासाठी?

तेजश्री प्रधान तिच्या अनेक मालिका,नाटक,सिनेमांतील भूमिकांमुळे प्रेक्षकांची फेव्हरेट आहे.

प्रणाली मोरे

झी मराठी वाहिनीवरील 'होणार सून...' या मालिकेतील जान्हवी या भूमिकेमुळे तेजश्री प्रधान(Tejashree Pradhan) घरोघरी पोहोचली,अन् त्यानंतर मात्र तिच्या करिअरची गाडी सुसाट पळाली. तिचं प्रशांत दामले यांच्यासोबतचं 'कार्टी काळजात घुसली' हे नाटक रसिकांनी डोक्यावर उचलून धरलं. 'ती सध्या काय करते' या तिच्या सिनेमातनं अंकुशसोबतच्या तिच्या जोडीला खूप पसंती मिळाली. नुकतीच येऊन गेलेली 'अग्गबाई,सासुबाई' या वेगळ्या धाटणीच्या मालिकेमधूनही तिनं साकारलेली शुभ्रा एक नंबर ठरली. आता हे सारं झालं तिच्या करिअरच्या बाबतीत ज्यानं ती कायम चर्चेत राहिली पण त्याचसोबत तिचं वैयक्तिक आयुष्यातलं मोठं वादळही चर्चेत आलं होतं. (Tejashree Pradhan Latest Post)

तेजश्रीनं अभिनेता शशांक केतकरसोबत लग्न केलं खरं पण त्यांचा संसार फार काळ टिकू शकला नाही. जेमतेम वर्षभर राहिल्यानंतर त्यांनी संगनमताने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आज शशांक त्याच्या आयुष्यात खूप पुढे गेलाय. त्यानं लग्न केलंय,त्याला नुकताच मुलगाही झाला आहे. पण अद्याप तेजश्रीनं लग्नच काय पण आपण कोणासोबत रीलेशनशीपमध्ये आहोत यावरही भाष्य केलेलं नाही. असो,सध्या मात्र ती तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

तेजश्रीनं ८ मार्च २०२२ या आपल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं एक पोस्ट केली आहे. तिनं त्यात म्हटलं आहे,''मी दुःख उगाळत बसत नाही, चुकीचं वागणाऱ्यांना मी सोडत नाही. माझ्यात लढा देण्याची ताकद आहे,व्यवस्थेची बळी मी ठरणार नाही,अन्याय सहन करणं माझ्या रक्तात नाही. आयुष्य कसं हवंय हे ठाऊक असलं की यश मिळवणं सोपं होतं''. अशा पद्धतीची एकंदरीत ती पोस्ट आहे. या तिच्या पोस्टचं अनेकांनी कौतूक केलं आहे, तर काहींना प्रश्न पडलाय की नेमकी ही पोस्ट तिनं कोणासाठी लिहिली आहे,की आयुष्यातील अनुभवावरनं तिनं ही पोस्ट लिहिली आहे असा चर्चेचा सूर उमटला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT