tejasswi prakash Sakal
मनोरंजन

Tejasswi Prakash: कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना तेजस्वी प्रकाशने चांगलंच सुनावलं, म्हणाली...

तेजस्वी प्रकाश आज टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव बनले आहे.

Aishwarya Musale

ग्लॅमरच्या दुनियेत हिरोइन्सच्या अभिनयासोबतच लोक त्यांच्या फॅशनवरही लक्ष ठेवून असतात. अनेक अभिनेत्रींना त्यांच्या एक्सपेरिमेंटल फॅशन सेन्सबद्दल खूप प्रशंसा मिळते, तर काहींची खिल्ली उडवली जाते. अनेक वेळा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वी प्रकाशलाही तिच्या कपड्यांमुळे जज केले जाते. अलीकडेच, अभिनेत्रीने जज करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

खरं तर, असं झालं होतं की, नुकतीच बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीतही तेजस्वी प्रकाश दिसली होती. नेहमीप्रमाणेच, अभिनेत्रीने तिच्या लुकचा प्रयोग केला आणि पँट-सूटसह पांढरा फुलांचा गजरा आणि चोकर सेट घातला. तिची स्टाईल अनेकांना आवडली होती, मात्र काही जणांनी तिला ट्रोल केले होते.

आता तेजस्वी प्रकाशने दिलेल्या मुलाखतीत ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. ती म्हणाली, "माझ्या आऊटफिटबद्दल जो कोणी माझा तिरस्कार करतो, हि एक चॉईस आहे, ज्याला मी बनवले आहे. कारण मला ते ऑर्गेनिक ठेवायला आवडते."

तेजस्वी प्रकाशने 'संस्कार-धरोहर अपनों की' मधून करिअरला सुरुवात केली. यानंतर तिने 'स्वरागिनी', 'पेहरेदार पिया की', 'रिश्ता लिखेंगे हम नया', 'कर्ण संगिनी', 'खतरों के खिलाडी 10' सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे.

'बिग बॉस 15' चा विजेता झाल्यानंतर तिचे नशीब उजळले. त्यानंतर तिला 'नागिन 6' ऑफर करण्यात आला. आज ती टीव्हीच्या सर्वात महागड्या आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे.

तेजस्वीच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या टीव्ही अभिनेता करण कुंद्राला डेट करत आहे. दोघांची भेट आणि प्रेम 'बिग बॉस 15' पासून सुरू झाले. दोघांनाही लोक प्रेमाने तेजरन म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lonavala Traffic : लोणावळ्यात २२० वाहनांवर कारवाई; एक लाख ८२ हजारांचा दंड वसूल

MPSC: ‘एमपीएससी’त अपात्र ठरलेल्या खेळाडूंना दिलासा; छत्रपती संभाजीनगर, निवडप्रक्रियेसाठी पात्र ठरविण्याचे मॅटचे आदेश

Supriya Sule : महायुती सरकारने दिवाळखोरीकडे वाटचाल केली; खासदार सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

लवकर सुधारणा करा! मुख्यमंत्र्यांची नगर विकास खात्याच्या कामावर नाराजी, फडणवीस अन् शिंदे यांच्यात ऑल इज नॉट वेल?

Teacher Transfer: ऑनलाइन बदली प्रक्रियेत शिक्षकांची डोकेदुखी; संचमान्यतेमुळे अतिरिक्त ठरण्याची टांगती तलवार, समायोजनाचाही प्रश्न

SCROLL FOR NEXT