Tejaswini Pandit latest news 
मनोरंजन

Tejaswini Pandit : 'आता सर्रास गोळीबार , खून, ड्रग्ज...? असा आपला महाराष्ट्र कधीच नव्हता'! तेजस्विनीची सणसणीत पोस्ट

तेजस्विनीच्या (Tejaswini Pandit New Post) त्या पोस्टनं आता वेगळ्याच चर्चेला उधाण आल्याचे दिसून आले आहे.

युगंधर ताजणे

Tejaswini Pandit Marathi actress : मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी ही नेहमीच आपल्या सडेतोड वक्तव्यासाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. आपल्याला जे वाटते (Tejaswini Pandit Marathi actress post) ते रोखठोकपणे मांडण्यात तेजस्विनी कायमच आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. आता तिच्या एका पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सध्या महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक वातावरण एका (Tejaswini Pandit news) वेगळ्याच दिशेला वाहत असल्याचे दिसून येते. गुन्हेगारी क्षेत्रामध्ये देखील दिवसेंदिवस वेगवेगळ्या शहरांमधील वाढते प्रकार चीड आणणारे आहेत. त्यात खून, बलात्कार, दरोडे, अत्याचार या प्रकारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. अशातच काही सेलिब्रेटींनी त्यावरुन प्रशासनाला त्याचा जाब विचारत महाराष्ट्रामध्ये काय चाललं आहे अशी विचारणा केली आहे.

तेजस्विनीनं देखील तिच्या पोस्टमधून याच गोष्टीवर बोट ठेवत पुन्हा एकदा ( Tejaswini Pandit viral latest news)आक्रमकपणे आपलं म्हणणं मांडलं आहे. तिनं एक्स वर पोस्ट करताना म्हटलं आहे की, दुष्काळ, बेरोजगारी, महागाई हे प्रश्न वर्षानुवर्ष सतावत आहेतच… आता सर्रास गोळीबार , खून, ड्रग्ज….? असा आपला महाराष्ट्र कधीच नव्हता. तेजस्विनीच्या त्या पोस्टनं नेटकऱ्यांचे, चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यावरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाणही आले आहे.

तेजस्विनीपूर्वी काही सेलिब्रेटींनी देखील राज्यातील सद्यस्थितीवर मार्मिक भाष्य करत आपली भावना व्यक्त केली आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, अंमली पदार्थांचा तरुणाईभोवती पडणारा विळखा याचा गंभीर परिणाम या सगळ्या परिस्थितीवर सेलिब्रेटींनी नाराजी व्यक्त केली असून त्यात तेजस्विनीच्या पोस्टनं लक्ष वेधून घेतलं आहे.

तेजस्विनीच्या प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास तिनं यापूर्वी विविध विषयांवरील चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये काम केले आहे. ती तिच्या भूमिकांमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. या शिवाय सद्यस्थितीवर बोलणाऱ्या सेलिब्रेटींमध्येही तेजस्विनी सक्रिय असल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

कोकण आपलोच आसा! सनई चौघडे मालिकेची टीम पोहचली कणकवलीत, फोटो पाहिलेत का?

MPSC Paper Leak: परीक्षा झाली, मुलाखतीही झाल्या; मग MPSC ने संपूर्ण भरतीच का रद्द केली? पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Latest Marathi News Live Update : टीम कुक ‘ॲपल’ची धुरा सोडणार

Kolhapur Gender Determination Case: गर्भलिंग निदानप्रकरणी ‘एस.पी. टोळी’ला मोका; राज्यातील पहिलीच कारवाई; ११ जणांवर बडगा

SCROLL FOR NEXT