tejaswini pandit news releted navratri 
मनोरंजन

तेजस्विनीचा रूग्णवाहिका सेवा पुरवणा-या कोरोना योध्यांना सलाम

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - कोरोना काळात सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारीची जाणीव ठेवत अविरत जनसेवा करणा-या कोरोनायोध्द्यांना यंदाच्या नवरात्रीमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित आदरांजली वाहत आहे. डॉक्टर, पोलिस, सफाई कर्मचारी, शेतकरी आणि प्राणीमित्रांना पहिले पाच दिवस आदरांजली अर्पित केल्यावर नवरात्रीच्या सहाव्या दिवशी तेजस्विनीने रूग्णवाहिका सेवा पुरवणा-यांचे आभार मानले आहेत.

रूग्णाचे प्राण वाचवण्यासाठी इच्छितस्थळी देवासारखे धावून येऊन डॉक्टरांपर्यंत पोहोचवणा-या रूग्णवाहिका अत्यंत मोलाची कामगिरी बजावतात. कोरोना काळात तर ‘सोशल डिस्टसिंग’च्या कारणास्तव माणूस माणसापासून दूर गेला असताना, रूग्णवाहिकांनी कोरोनारूग्णांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवायची जबाबदारी अतिशय दक्षपणे आणि अहोरात्र चालवली. त्यामूळे तेजस्विनी पंडितने षष्ठीला ह्या ‘दैवी’ कर्म करण्याची प्रेरणा घेऊन काम केलेल्या रूग्णवाहिका चालकांचे आभार मानले आहेत.

तेजस्विनी पंडित म्हणते, “कोरोना झाल्यावर रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रेन अशा सार्वजनिक वाहतूकीने प्रवास करू शकत नाही. तुम्हांला बरं नसताना, तुमचे आपले नातेवाईकही तुम्हांला हात धरून हॉस्पिटलपर्यंत पोहोचवू शकत नाही. अशावेळी एकाकी पडलेल्या रूग्णांना खरा मदतीचा हात दिला तो ह्या रूग्णवाहिका चालकांनी. आपला जीव धोक्यात घालून हजारो रूग्णांना त्यांनी जीवनदान मिळवण्यासाठी प्रयत्न केले. “

तेजस्विनी पूढे म्हणते, “आज आपण कोरोनायोध्द्यांमध्ये पोलिस, डॉक्टरांची नाव आवर्जून घेतो. पण रूग्णवाहिका चालकांच्या ‘खारी’च्या वाट्याला मात्र आपण विसरलो आहोत. जसा खारींनी प्रभु रामचंद्रांना सेतू बांधायला मदत केल्यामूळेच तर असत्यावर सत्याचा विजय झाला. तसंच कोरोनारूपी रावणाला हरवायला, रूग्णवाहिकांनी उचललेला वाटा खूप महत्वाचा आहे.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Criticism : 'कॉमेडियनना भेटायला वेळ, पण जरांगेंशी बोलायला नाही ’; अभिजीत दिपकेंचा सरकारवर घणाघात

Dahi Handi Govinda Death : दहीहंडीचा कार्यक्रम आटोपून परतताना शिरोळमधील २८ वर्षीय गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शेवटचा फोटो बाळूमामांसोबतचा

Onion Payment: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सव्वा दोन कोटी कांद्याचे पैसे अडकले; शरद पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन

मालिकेत सुखाचा संसार पण खऱ्या आयुष्यात सिंगल; दुसऱ्या लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या तेजश्रीचं वय काय?

Ujani Canal: कालवा तुडुंब, पण वीज गायब; महावितरणच्या लोडशेडिंगमुळे पेनूर परिसरातील शेतकरी संतप्त, पिके जळू लागली

SCROLL FOR NEXT