Tejaswini Pandit photo tribute to Coronado Doctor 
मनोरंजन

कोरोनायोध्दा डॉक्टरांना तेजस्विनी पंडितचा फोटोतून ट्रिब्यूट

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - अभिनेत्री तेजस्विनी पंडितचे नवरात्री स्पेशल फोटोशूट नेहमीच तिच्या चाहत्यांमध्ये आणि सिनेसृष्टीमध्ये चर्चेचा विषय असतो.  दरवर्षी वैविध्यपूर्ण कल्पनांव्दारे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तेजस्विनी आपले फोटोशूट घेऊन येते. यात कधी स्त्रीशक्तीला सलाम असतो, तर कधी अदिशक्तीला आदरांजली असते तर कधी सद्यस्थितीवर केलेले भाष्य असते. यावेळी तेजस्विनीने आपल्या फोटोशूटमधून कोरोनायोध्यांना मानवंदना दिली आहे.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी डॉक्टर बनून पीपीई किट घातलेली रूग्णांना जीवनदान देणारी देवी तेजस्विनीने साकारलेली आहे. आपल्या ह्या फोटोशूटविषयी तेजस्विनी पंडित म्हणते, “ रूग्णांचे प्राण वाचवणं ही विज्ञानाने डॉक्टरांना दिलेली ‘दैवी’ देणगी आहे. कोणत्याही संकटकाळी आपण देवाचा धावा करतो. आणि पहा ना. कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स आणि आरोग्यसेवेशी निगडीत कर्मचारी कसे देवासारखे धावून आले. आपली वैयक्तिक सुखदु:ख विसरून अहोरात्र रूग्णसेवा करणा-या डॉक्टरांमधल्या दैवी कर्माला ह्या फोटोव्दारे वाहिलेली ही आदरांजली आहे.” 

नवरात्री फोटोशूट करण्याची संकल्पना तेजस्विनी पंडितने सिनेसृष्टीत आणली. आता अनेकजणं वेगवेगळ्या रूपांमधली फोटोशूट करत असतात. 2017 पासून तेजस्विनी पंडित दरवर्षी एका नव्याविषयासह नवरात्रीचे फोटोशूट करत असते. तेजस्विनी ह्याविषयी सांगते, “2017 ला आजूबाजूच्या परिस्थितीवर आपण काहीतरी व्यक्त व्हावं असं वाटलं. आणि एक फोटोशूट केलं. सोशल मीडियावर फोटो येताच अनेकांनी पाठ थोपटली.

आता तर ‘नवरात्रीत काय घेऊन येणार’ अशी चाहत्यांकडून आवर्जून विचारणा होऊ लागलीय. त्यामूळे हुरूप येतो आणि एक जबाबदारीचीही जाणीव असते. प्रत्येक वर्षी मी त्यावेळी मनात जे काही खदखद असते, ते नवरात्री फोटोशूटमधून व्यक्त होते, ह्या फोटोशूटमागे अर्थातच माझ्या टिमचा खूप सपोर्ट असतो.”
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT