televison actress anita hassanandani singing gayatri mantra to son aaravv watch video 
मनोरंजन

लहान मुलाला ऐकवला गायत्री मंत्र, व्हिडिओ व्हायरल 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  टेलिव्हिजन अभिनेत्री अनिता हसनंदानी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी अभिनेत्री आहे. तिनं पती रोहित रेड्डी बरोबर आपल्या मुलाचे काही फोटो शेअर केले होते. त्यामुळे ती चर्चेत आली होती. त्या दोघांचा मोठा चाहतावर्ग सोशल मीडियावर आहे. अनितानं 9 फेब्रुवारीला आरवला जन्म दिला. तेव्हापासून अनिता चर्चेत आहे. आम्ही दोघे आईबाप झाल्याची माहितीही तिनं सोशल मीडियातून चाहत्यांना दिली होती. गेल्या काही दिवसांपासून ते वेगवेगळे फोटो शेअर करून चाहत्यांना वेगळी ट्रीट देत आहे.

आता अनिताचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात तिनं आरवला गायत्री मंत्र ऐकवला आहे. त्या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर पसंती मिळताना दिसत आहे. त्या व्हिडिओला अनितानं सोशल मीडियावरुन शेअर केलं आहे. चाहत्यांनी देखील अनिताच्या व्हिडिओला लाईक करुन कमेंट केल्या आहेत. त्या व्हिडिओमध्ये अनितानं आरवला कडेवर घेतलं आहे. आणि त्याच्या कानात ती गायत्री मंत्र गुणगुणत आहे. त्यावेळी त्या चिमुरड्याचे एक्सप्रेशन कॅमे-यात कैद झाले आहेत. आरवच्या जन्मानंतर अनिता आणि रोहितनं इंस्टाग्रामवर एक वेगळे पेज तयार केले आहे.

इंस्टावर अनितानं आरवचे वेगवेगळे फोटो त्या पेजवर शेअर केले आहेत. आरवच्या त्या पेजवर आतापर्यत 10 पेक्षा जास्त पोस्ट शेअर करण्यात आले आहेत. तर त्याला 50 हजारापेक्षा जास्त फॉलोअर्स मिळाले आहेत. यापूर्वी आरवचा एक फोटो इंस्टावर शेअर करण्यात आला होता. त्यावेळी आरवच्या स्माईलीला लाईक्स मिळाले होते.  त्या फोटो कॅप्शनमध्ये लिहिले आहे की. मला माहिती आहे की मी माझ्या वडिलांसारखा दिसतो आहे. असे जरी असले तरी माझे आईवर सगळ्यात जास्त प्रेम आहे. 

 
 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT