Telugu Actor Chandra Mohan dies due to cardiac arrest  Esakal
मनोरंजन

Chandra Mohan Death: ज्येष्ठ अभिनेते चंद्र मोहन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन! 900 हून अधिक चित्रपटांमध्ये केलं होतं काम

Vaishali Patil

Chandra Mohan passes away: साउथ चित्रपटसृष्टीतून दु:खद बातमी समोर आली आहे. तेलुगू सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते चंद्र मोहन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, चंद्र मोहन यांना हृदयविकाराच्या आजारामुळे हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांनी सकाळी 9:45 वाजता अखेरचा श्वास घेतला.

चंद्र मोहन यांच्या निधनाची बातमी समोर येताच मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांचे चाहते आणि स्टार्स त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी जालंधर आणि दोन मुली असा परिवार आहे.

चंद्र मोहन यांचे अंतिम दर्शन आणि अंत्यसंस्कार विधी सोमवारी हैदराबादमध्ये होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

चंद्र मोहन यांनी 1966 मध्ये आलेल्या रंगुला रत्नम या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. पाधारीला वायासू, चंदामामा रावे, अथनोक्कडे, 7जी वृंदावन कॉलनी, मिस्टर अशा अनेक चित्रपटांमधील अभिनयासाठी ते लोकप्रिय होते.

रिपोर्टनुसार त्यांच्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी सुमारे 935 चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यापैकी अनेक चित्रपटांमध्ये त्यानी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. त्यांना अनेक नंदी पुरस्कार मिळाले आहेत. श्रीदेवी, जयाप्रदा, जयसुधा यांसारख्या अभिनेत्रींसोबत चंद्र मोहन यांनी काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Restaurant Fire : दिल्लीत रेस्टॉरंटमध्ये भीषण आग, २१ जणांचा होरपळून मृत्यू; आपचे माजी आमदार घटनास्थळी दाखल

Maratha Reservation: मृत आंदोलकांच्या वारसांना मोठा दिलासा! अंतरवाली सराटीतील आश्वासनाची पूर्तता; एमआयडीसीत नोकरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे आदेश

देशातील ३२ हजार टन सोन्यावर मोदी सरकारची नजर; १ टक्के जरी बाजारात आलं तरी टेन्शन मिटणार, नेमकी काय आहे योजना?

सासर असावं तर असं! सुनेची मालिका पाहण्यासाठी लावली थेट मोठी स्क्रीन, प्राजक्ता गायकवाड पोस्ट करत म्हणाली...

Mumbai News: मुंबईच्या जमिनीत पाणी जिरवण्याची क्षमता शून्य! रस्ते काँक्रीटीकरणाचा दुष्परिणाम, तीन दशकांत ६० टक्के जमीन सिमेंटखाली

SCROLL FOR NEXT