venu madhav died at the age of 39 
मनोरंजन

तेलुगु कलाकार आणि कॉमेडियन वेणू माधव यांचे निधन

वृत्तसंस्था

तेलंगणा : तेलुगु चित्रपटसृष्टीचे प्रसिद्ध कॉमेडियन वेणू माधव यांचे वयाच्या 39 व्या वर्षी निधन झाले आहे. मंगळवारी (24 सप्टेंबर) प्रकृती खालावल्याने त्यांना सिकंदराबाद येथील एका हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. त्यानंतर आज त्यांचे निधन झाले.

डॉक्टरांनी त्यांना किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला होता. प्रक्रियेनंतर गेल्याच आठवड्यात त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर दोनच दिवसात त्यांची तब्येत खालावली. आज त्यांच्या अचानक निधनाने टॉलिवूडमध्ये दु:ख व्यक्त केलं जात आहे.

तेलुगु देसम पार्टीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ट्विट करताना वेणू माधव यांना श्रद्धांजली वाहिली. शिवाय त्यांच्या चाहत्यांनीदेखील ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहली आहे. 

वेणू माधव यांनी मिमिक्री आर्टिस्ट म्हणून आपल्या करीअरला सुरुवात केली. त्यांनी 1996 ला आलेला तेलुगु चित्रपट 'संप्रदायम' मधून टॉलिवूडमध्ये पर्दापण केले.  त्यानंतर ते अनेक चित्रपटांमधून कॉमेडियनच्या भूमिकेत समोर आले. तमिळ आणि तेलुगु भाषांमधून त्यांनी आतापर्यंत जवळपास 200 चित्रपटांमध्ये काम केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परदेशी भक्तांकडून श्री विठ्ठलाच्या महापूजेची नोंदणी! अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबईतील भाविक करणार महापुजा; मंदिर समितीला ९० लाखांचे उत्पन्न, वाचा...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतताना भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू; पिकअपने धडक देताच बस उलटली

Pune Crime : प्रति तोळा फक्त ६० हजार, स्वस्त सोन्याच्या आमिषाने उकळले पैसे; दाम्पत्याला अटक

LPG Crisis: देशहितासाठी त्याग! ६ महिने सिलेंडरला पूर्ण ‘नकार’; महाराष्ट्रातील गावांचा मोठा निर्णय, LPG वापर बंद राहणार

Pune News : पतीला मारहाण अन् सासरच्यांना शिवीगाळ; पुण्यात पत्नीच्या 'क्रूर' वर्तनामुळे घटस्फोट मंजूर; कौटुंबिक न्यायालयाचा मोठा निकाल

SCROLL FOR NEXT