Telugu Music composer Raj of the Raj-Koti duo passes away!
Telugu Music composer Raj of the Raj-Koti duo passes away!  sakal
मनोरंजन

Raj of Raj-Koti Passed Away: दिग्गज दाक्षिणात्य संगीतकार राज यांचे निधन

नीलेश अडसूळ

Raj of Raj-Koti Passes Away : दाक्षिणात्य संगीत दिग्दर्शक राज यांचे निधन झाले आहे. ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तेलुगू चित्रपटात त्यांचे प्रचंड मोठे योगदान आहे.

रविवारी २१ मे रोजी संध्याकाळी हैदराबाद येथे त्यांच निधन झाले. माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार हृदयविकराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या राहत्या घरीच ते बाथरूममध्ये अचानक कोसळले.

Telugu Music composer Raj of the Raj-Koti duo passes away!

राज आणि कोटी ही दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील एक नामवंत संगीतकार जोडी. ही जोडी आली म्हणजे दमदार संगीत होणार अशी निर्मात्यांना खात्री असायची. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज संगीतकारांनसोबत राज-कोटी यांनी म्युजिक कंपोजन केलं आहे. अगदी ए. आर. रहमान यांच्याकडे ही ते प्रोग्रामर म्हणून होते. जवळपास १८० हूं अधिक चित्रपटांसाठी या जोडीने संगीत संयोजन केले आहे.

बालासुब्रमण्यम यांच्या कित्येक गाण्यांना त्यांनी संगीत दिले. 1994 मध्ये आलेल्या 'हॅलो ब्रदर' या चित्रपटासाठ त्यांना सर्वश्रेष्ठ संगीतकाराचा पुरस्कार मिळाला होता, ज्या चित्रपटात नागार्जुन यांनी मुख्य भूमिका केली होती. त्यानंतर काही वर्षांनी राज आणि कोटी वेगळे झाले आणि स्वतंत्र काम करू लागले.

राज यांचे खरे नाव थोटकुरा सोमराजू असे होते. पण त्यांना राज म्हणूनच सगळे ओळखायचे. त्यांचे वडील हे टीवी राजू हे प्रसिद्ध दाक्षिणात्य संगीतकार होते. राज निधनाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: शेअर बाजाराची किंचित घसरणीसह सुरुवात; बँक निफ्टीमध्ये रिकव्हरी, कोणते शेअर्स वधारले?

Pakistan: बुडत्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आता पाकिस्तानची नवी आयडिया; चक्क गांजा विकून चालवणार देश

SRH vs LSG : त्यांची बॅटिंग आधी असती तर... शर्मा आणि हेडच्या तांडव नृत्यावर क्रिकेटच्या देवाने दिला मोठा संकेत

Neuralink : न्यूरालिंक प्रोजेक्ट धोक्यात? रुग्णाच्या मेंदूत बसवलेल्या चिपमध्ये तांत्रिक अडचणी.. इलॉन मस्कच्या कंपनीने दिली माहिती

Shivani Surve: बिग बॉस फेम शिवानी सुर्वेचा तब्बल 9 वर्षांनंतर धमाकेदार कमबॅक; 'या' मालिकेत साकारणार भूमिका, पाहा प्रोमो

SCROLL FOR NEXT